परळीत निवडणुकांच्या धामधुमीत हत्याकांड, राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकाची निर्घृण हत्या
एबीपी माझा वेब टीम | 25 Mar 2019 08:19 AM (IST)
परळी नगरपरिषदेतील राष्ट्रवादीच्या विद्यमान नगरसेविका मीनाबाई गायकवाड यांचे पती आणि माजी नगरसेवक पांडुरंग गायकवाड यांची तलवारीने वार करुन हत्या करण्यात आली
बीड : बीडमधील परळी नगरपरिषदेच्या माजी नगरसेवकाची निर्घृण हत्या करण्यात आली. पांडुरंग गायकवाड यांच्या तलवारीने हल्ला करण्यात आला होता. गायकवाड हे राष्ट्रवादीच्या विद्यमान नगरसेविका मीनाबाई गायकवाड यांचे पती आहेत. निवडणुकांच्या रणधुमाळीत झालेल्या माजी नगरसेवकाच्या हत्याकांडामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. पांडुरंग गायकवाड हे परळी नगरपरिषदेचे माजी नगरसेवक होते. गायकवाड हे विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांचे समर्थक होते. परळी ओव्हरब्रिजच्या खाली काल (रविवारी) रात्री त्यांच्यावर तलवारीला हल्ला करण्यात आला. यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला. हल्ल्याचे कारण अस्पष्ट असून पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत. UNCUT | महायुतीची प्रचार सभा, नितीन बानगुडे पाटील यांचं भाषण | कोल्हापूर