बीड : दिवाळी हा सर्व वादविवाद विसरून एकत्र येण्याचा, आनंद वाटण्याचा सण आहे. दिवाळीची धूम सुरू असताना परळीत राज्याच्या ग्रामविकास, महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांची समोरासमोर भेट झाली. यावेळी दोघांनीही एकमेकांना आनंदाने दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.
बीडच्या व्यापार भागात आज लक्ष्मी पूजनाची लगबग होती. सगळे मार्केट फुलून गेले होते. यावेळी व्यापाऱ्यांना शुभेच्छा देण्यासाठी पालकमंत्री पंकजा मुंडे परळीचा व्यापार भागात पोहोचल्या. त्याचवेळी राज्याचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे देखील शुभेच्छा देण्यासाठी व्यापाऱ्याकडे गेले होते. दोघेही आपल्या समर्थकांसह परळीच्या मोंढा भागात असतांना अचानक या बहीण-भावांची सुरेश मुंडे यांच्या आडत दुकानात अचानक भेट झाली.
यावेळी दोघेही समोरासमोर आले. त्यामुळे कार्यकर्तेही बुचकळ्यात पडले, मात्र अचानक समोरासमोर आलेल्या या भावंडांनी हसतमुख होत हस्तांदोलन करत एकमेकांना दीपावलीच्या शुभेच्छा देत शुभचिंतन केले. मग या दोन्हीही नेत्यांनी एकमेकांच्या कार्यकर्त्यांनाही शुभेच्छा दिल्या. दोघांनी आपसूक एकाचवेळी एकमेकांना हात जोडून नमस्कार केला. नंतर "हॅपी दिवाळी" असे शब्दही दोघांच्या तोंडून एकदाच निघाले. नंतर दोघांनी एकमेकांच्या हातात हात दिले. यावेळी धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांचे पती अमित पालवे यांच्याशी संवाद साधून त्यांनाही शुभेच्छा दिल्या. काही क्षणासाठी ही आनंदी भेट परळीकरासाठी चर्चेचा विषय ठरली.
पंकजा मुंडे अन धनंजय मुंडे समोरासमोर आले, दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
07 Nov 2018 11:30 PM (IST)
व्यापाऱ्यांना शुभेच्छा देण्यासाठी पालकमंत्री पंकजा मुंडे परळीचा व्यापार भागात पोहोचल्या. त्याचवेळी राज्याचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे देखील शुभेच्छा देण्यासाठी व्यापाऱ्याकडे गेले होते.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -