नांदेड : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कुटुंब नसल्याची टीका केली जाते. पण नरेंद्र मोदी यांचं कुटुंब ही जनता आहे. स्वत:च्या चोऱ्या लपवण्यासाठी भाषणं करतात चोर कुठले, अशा शब्दात ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी कॉंग्रेस-राष्ट्रवादीवर बोचरी टीका केली. पंकजा मुंडे नांदेड जिल्ह्यातील नरसीमध्ये एका खाजगी पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी उपस्थित होत्या.
या कार्यक्रमात पंकजा मुंडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करणाऱ्यांवर टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशातील प्रत्येक नागरिकाला आपलं कुटुंब समजून काम करतात. मात्र हे कालचे आलेले नेते स्वत:च्या चोऱ्या लपवण्यासाठी भाषणं करतात. चोर कुठले, यांनी या राज्याला लूटलं, या देशाला लूटलं आणि हे लोकं सांगतात की नरेंद्र मोदी यांना कुटुंब नाही.
पण या देशातील गरीब, वंचित, पीडित जनता ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा परिवार आहे, असं पंकजा मुंडे म्हणाल्या. त्या नरसी येथील जय भारत शिक्षण प्रसारक मंडळाने आयोजित केलेल्या कर्तृत्ववान महिलांच्या सन्मान सोहळ्यात बोलत होत्या.
पंकजा मुंडे यांनी माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यावरही निशाणा साधला. नांदेड जिल्ह्याला देशातील आणि राज्यातील सर्वोच्च पदे मिळाली. पण नांदेड जिल्ह्याचा म्हणावा तसा विकास झाला नाही. आजही नरसी येथे पाण्याची समस्या आहे. माझ्याकडे राज्याचं मंत्रीपद असलं तरी मी बीड जिल्ह्याकडे दुर्लक्ष करत नाही, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.
अशोक चव्हाणा यांचे वडील शंकरराव चव्हाण हे केंद्रीय गृहमंत्री होते. शिवाय त्यांनी महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपदही भूषवलं आहे. तर अशोक चव्हाण हे माजी मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे पंकजा मुंडे यांनी विकासाच्या मुद्यावरुन दोघांवरही निशाणा साधला.
स्वत:च्या चोऱ्या लपवण्यासाठी भाषणबाजी, पंकजा मुंडेंची काँग्रेस-राष्ट्रवादीवर टीका
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
10 Feb 2019 12:57 PM (IST)
पंकजा मुंडे यांनी माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यावरही निशाणा साधला.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -