लातूर : लातूरमधील मांजरा नदीतला गाळ काढण्याचं काम सुरु असताना महाराष्ट्राच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी सेल्फी काढल्याने विरोधकांकडून टीकेची झोड उठली आहे. इतकंच नाही तर सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेनेही पंकजा मुंडेंवर निशाणा साधला आहे.


 

लातूर जिल्ह्यातील केसाई गावात भीषण दुष्काळामुळे मांजरा नदीचं पात्र कोरडं ठाक पडलं आहे. याठिकाणी गाळ काढण्याचं काम सुरु आहे. त्याची पाहणी करण्यासाठी पंकजा मुंडे लातूरला गेल्या होत्या. त्यावेळी बॅकग्राऊंडला गाळ काढण्याचं काम सुरु असताना पंकजांनी सेल्फी काढला. तसंच सोबत असलेल्या अधिकाऱ्यांसोबतही पंकजांनी त्यांच्या कॅमेऱ्यात सेल्फी काढला.

 

https://twitter.com/Pankajamunde/status/721575635827757057

 

राज्यात भीषण दुष्काळ असताना पंकजा मुंडे फोटोसेशन करण्याची असंवेदनशीलता कशी दाखवतात? असा आरोप विरोधक करत आहेत.

 

दरम्यान पंकजा मुंडेंनी ट्विटरवरुन विरोधकांच्या टीकेला उत्तर दिलं आहे. जलसंधारणाचं काम चांगल्या पद्धतीने सुरु आहे, ही संवेदना नाही का? असं सवाल त्यांनी विचारला.

https://twitter.com/Pankajamunde/status/721578304839553024