मुंबई : राज्यातील  ग्रामपंचायत आणि नगरपंचायत निवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार आहे.  विविध जिल्ह्यातील 1 हजार 151 ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सरासरी 75.35 टक्के मतदान झालं. तर राज्यातील सहा नवनिर्मित नगरपंचायतीसाठी सरासरी 78.15 टक्के मतदान झालं. राज्याचे निवडणूक आयुक्त जे एस सहारिया यांनी ही माहिती दिली.   कुडाळ, लोणंद, माढा, माळशिरस, मोहोळ आणि लोहारा या सहा नवनिर्मित नगरपंचायतींची ही पहिलीच सार्वत्रिक निवडणूक होती.  निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाल्यानंतर संबंधित ठिकाणची आचारसंहिता संपुष्टात येईल.   याशिवाय  विविध महानगरपालिका आणि जिल्हा परिषदांच्या रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठीही रविवारी मतदान झालं. नवी मुंबई महानगरपालिकेतील प्रभाग क्रमांक 6 च्या पोटनिवडणुकीची मतमोजणी रविवारी होऊन निकालही कालच लागला. या राष्ट्रवादी काँग्रेसच्या संध्या यादव विजयी झाल्या.   ग्रामपंचायत निवडणुकीत सरासरी मतदानाची टक्केवारी 
जिल्हाग्रामपंचायतीची संख्यामतदान

ठाणे

10172.68 %
पालघर29564.01 %
रायगड0370.86 %
सिंधुदुर्ग0174.44 %
नाशिक21878.46 %
नंदुरबार19768.29 %
अहमदनगर3269.44 %
जळगाव1876.73 %
धुळे6375.76 %
पुणे3678.53 %
सोलापूर0276.30 %
सातारा0189.76 %
औरंगाबाद0588.50 %
उस्मानाबाद0285.75 %
बीड0285.46 %
जालना0681.95 %
नांदेड6470.92 %
अमरावती0573.25 %
यवतमाळ6174.78 %
अकोला0347.55 %
वाशिम0160.93 %
बुलडाणा0477.02 %
नागपूर0773.41 %
वर्धा0667.00 %
चंद्रपूर0186.20 %
भंडारा1176.37 %
गोंदिया0184.20 %
गडचिरोली0281.19 %
एकूण1151सरासरी 75.35%
    नगरपंचायत निवडणुकीत सरासरी मतदानाची टक्केवारी  
नगरपंचायतजिल्हामतदान
कुडाळसिंधुदुर्ग73.63 %
लोणंदसातारा75.93 %
माढासोलापूर81.31 %
माळशिरससोलापूर82.18 %
लोहाराउस्मानाबाद78.18 %
एकूण 78.15%