पुणे : पंकजा मुंडेंनी (Pankaja Munde) उदयनराजे यांची कान पकडून क्षमा मागितली. शिखर शिंगणापूर येथे पंकजा मुंडे दर्शनासाठी गेल्या असता काही कारणामुळे त्यांना शिखर शिंगणापूर येथे पोहचायला उशीर झाला. मात्र त्याचवेळी पंकजा मुंडे यांची वाट बघत उदयनराजे थांबले होते. त्यावेळी त्यांनी उशीर झाल्यामुळे उदयनराजे भोसले यांची क्षमा मागितली.  शिखर शिंगणापूर येथे पंकजा मुंडे यांचे स्वागत फुलांची उधळण करून स्वागत करण्यात आलं.


भाजप नेत्या पंकजा मुंडे यांची  परिक्रमा यात्रा सुरू आहे. सातारा जिल्ह्यातील शिखर शिंगणापूर येथे येथील रक्षण महादेवाचे दर्शन पंकजा मुंडे यांनी घेतलं यावेळी खासदार उदयनराजे भोसले देखील उपस्थित होते. अखंड महाराष्ट्राचा कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडेरायाचे दर्शन घेऊन पंकजा मुंडे शंभू महादेवाच्या दर्शनाला गेल्या यावेळी खासदार उदयनराजे भोसले यांनी पंकजा मुंडे यांना तलवार भेट दिली. पंकजा मुंडे यांनी शंभू महादेवाला अभिषेक घातला यावेळी त्यांच्यासोबत आमदार माधुरी मिसाळ देखील उपस्थित होत्या.


'माझ्या मनगटापेक्षा पंकजाताईचं मनगट मोठं आहे. एका स्त्रीच्या हातात आज तलवार दिली. तिचा सन्मान केला. माझ्या बहिणीचं काम चांगलं म्हणून तलवार दिली आहे. गोपीनाथ मुंडे आमचे आदर्श, त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून आम्ही चालतो', असं म्हणत उदयनराजेंनी पंकजा मुंडे यांचं कौतुकही केलं. 


शिखर शिंगणापूर माझे कुलदैवत म्हणून मी इथे येते. या मंदिरात महापुजा केली. माझ्या मोठ्या भावाने म्हणजेच उदयनराजे भोसलेंनी मला तलवार देवून सन्मान केला. माझे बंधू माझ्या कायम सोबत असतात, असं म्हणत पंकजा मुंडे यांनीदेखील उदयनराजेंचा आशिर्वाद घेतला. 


पंकजा मुंडे घेतलंं जेजुरी खंडेरायाचे दर्शन


भारतीय जनता पार्टीच्या नेत्या पंकजा मुंडे या राज्यभर देवदर्शन दौरा करीत आहेत. आज अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरी येथील खंडेरायाचे दर्शन पंकजा मुंडे यांनी घेतले. गाभारा दर्शनासाठी  बंद असल्याने सुरुवातीला पंकजा मुंडे यांनी बाहेरून दर्शन घेतलं. त्यानंतर त्यांनी गाभाऱ्यात जाऊन मंदिर पाहण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानंतर पंकजा मुंडे यांनी गाभाऱ्यात जाऊन दर्शन घेतले. गाभाऱ्यात गेल्यानंतर त्यांनी भंडार घरात जाऊन खंडोबाच्या मूर्तीचे दर्शन घेतले. पंकजा मुंडे कुलधर्म कुलाचार, तळी भंडार आणि भंडाऱ्याची उधळण केली. यानंतर मार्तंड देवस्थानच्या वतीने काठी आणि घोंगडी देऊन पंकजा मुंडे यांचा सन्मान केला. यावेळी आमदार माधुरी मिसाळ आणि पुणे भाजप जिल्हा अध्यक्ष वासुदेव काळे उपस्थित होते. पंकजा मुंडे या सातारा जिल्ह्यातील शिखर शिंगणापूर कडे रवाना झाल्या. यावेळी पुरंदर तालुक्यातील सासवड आणि जेजुरी येथे पंकजा मुंडे यांचे स्वागत झाले.


इतर महत्वाची बातमी-


Pune News : भाजप नेत्या पंकजा मुंडे जेजुरीच्या खंडोबाच्या चरणी लीन