Pankaja Munde: मराठा-ओबीसी प्रश्न सामोपचाराने सोडवून विरोधकांचं 'फेक नॅरेटीव्ह ' खोडून काढणार असल्याची प्रतिक्रिया आमदार पंकजा मुंडे(Pankaja Munde) यांनी दिली आहे. विधान परिषदेत (Vidhan Parishad election result) मिळालेल्या विजयानंतर त्यांची ही पहिली प्रतिक्रिया होती.
"काल राज्यात एकही असं गाव नसेल जिथे गुलाल उधळला नाही फटाके उडवले नाहीत. सर्व कार्यकर्त्यांना प्रचंड आनंद झाला आहे. मला इथं भेटायला अर्ध बीड एकवटलं आहे." असं म्हणत पक्षाने दिलेल्या संधीबाबत पंकजा मुंडे यांनी आभार मानले.
मराठा-ओबीसी प्रश्न सामोपचाराने सोडवणार
विधान परिषदेत गेल्यानंतर अनेक महत्त्वाची कामे आहेत. मराठा ओबीसी आरक्षण प्रश्न मोठा आहे. एका बाजूला मनोज जरांगे तुमचे 288 आमदार पाडू असं म्हणत असताना तसेच ओबीसी नेते लक्ष्मण हाके ही मुंबई जाम करू अशी घोषणा करत असताना यावर उपाय काढला पाहिजे. नेत्यांनी मॅच्युअरली हा विषय हाताळायला हवा असंही पंकजा मुंडे म्हणाल्या.
मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीतही..
मराठा ओबीसी आरक्षण प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकीत मलाही बोलावले होते. समाजाच्या दोन्ही लोकांना बोलवून यावर मार्ग काढावा असे मी म्हणाले होते.
यामध्ये समाज असतो,आणि त्यामुळे त्यांना पिढ्यानपिढ्या किंवा काही वर्ष तरी त्रास होत असतो. तो त्रास होऊ नये हे आमचे दायित्व आहे. हे प्रकरण आता वाढू नये. त्यामुळे मराठा ओबीसी आरक्षण प्रश्न सामोपचाराने सोडवायचा आहे असे पंकजा मुंडे म्हणाल्या.
मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चेकडे माझं लक्ष नाही
राज्यात सध्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चा होत आहेत. दरम्यान मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चेकडे माझं लक्ष नाही. राज्याच्या राजकारणात काम करायला मिळणार आहे त्यामुळे आनंद आहे, अशी प्रतिक्रिया पंकजा मुंडे यांनी दिली.
पंकजा मुंडे यांचा बीड लोकसभा मतदारसंघात पराभव झाला होता. मात्र, विधानपरिषदेतील विजयाने पंकजा यांचे राजकीय पुनर्वसन झाले आहे. तसेच पंकजा मुंडे महाराष्ट्राच्या राजकारणात परतल्या आहेत.
फेक नॅरेटीव्ह खोडून काढणार
विधान परिषदेत विजयी होणार याबाबत अधिक आम्हाला विश्वास होता. आता राज्यात आल्यामुळे सध्या जे काही फेकण्यासाठी बनवण्यात आले आहे ते खोडून काढायचे आहे.असे पंकजा मुंडे म्हणाल्या. जी मत फुटली त्याबाबत मला माहिती नाही. कारण मला पक्षाची २७ मत मिळाली आहेत,असेही त्यांनी सांगितले.
हेही वाचा: