Pankaja Munde Meets CM Devendra Fadnavis : भाजप नेत्या आणि आमदार पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांची भेट घेतली आहे. या भेटीत पंकजा मुंडे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत मराठवाड्यातील दुष्काळावर ( Marathwada Drought) चर्चा केली आहे. तसेच मराठवाड्यातून होणाऱ्या स्थलांतरावर (migration) देखील चर्चा केली आहे. याबाबतची माहिती पंकजा मुंडे यांच्या त्यांच्या फेसबुक आणि ट्वीटवर पोस्ट करत दिली आहे.
पोस्टमध्ये नेमकं काय म्हणाल्या पंकजा मुंडे?
ट्वीटर आणि फेसबुकवर केलेल्या पोस्टमध्ये पंकजा मुंडे यांनी देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन केलं आहे. तसेच या भेटीत मराठवाड्याच्या मुद्द्यांवर, विशेषत: दुष्काळ निर्मूलन आणि काही भागातील बेरोजगारी सोडवण्याच्या मुद्यावर चर्चा झाल्याची माहिती पंकजा मुंडे यांनी दिली आहे. महाराष्ट्रातील आर्थिकदृष्ट्या मागास भाग आणि बीडमधील स्थलांतरित कामगारांच्या समस्यांकडे विशेष लक्ष देण्याचे आश्वासन यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याची माहिती देखील पंकजा मुंडे यांनी दिली आहे.
पंकजा मुंडे यांची मंत्रीमंडळात वर्णी लागण्याची शक्यता
दरम्यान, पुढच्या 4 ते 5 दिवसात महाराष्ट्र सरकारच्या मंत्रीमंडळाचा शपथविधी देखील होण्याची शक्यता आहे. यामध्ये मंत्रीपद मिळवण्यासाठी अनेक नेते इच्छुक असल्याचं बोलंल जात आहे. भाजपच्या संभाव्य मंत्र्यांची यादी देखील समोर आली आहे. यामध्ये मराठवाड्याला भाडपकडून दोन मंत्रीपदं मिळण्याची शक्यता आहे. यामध्ये पंकजा मुंडे यांचं नाव आघाडीवर आहे. तसेच अतुल सावे यांनी देखील मंत्रीपद मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, खरचं पंकजा मुंडे यांची मंत्रीमंडळात वर्णी लागणार का? हे येत्या 4 ते 5 दिवसात समजणार आहे. दरम्यान, पंकजा मुंडेंच्या यांची मंत्रीमंडळात वर्णी लागणारच असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे. मात्र, देवेंद्र फडणवीस नेमका काय निर्णय घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. पंकजा मुंडे यांचा यांचा मंत्रीमंडळात समावेश झाला तर त्यांना नेमकं कोणत खातं मिळणार याची देखील चर्चा सुरु आहे. दरम्यान, सध्या महायुतीत तीन मोठे पक्ष आहेत. यामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला किती पदं जाणार आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला किती मंत्रीपदं जाणार हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे. मात्र, सर्वच पक्षातील संभाव्य मंत्र्यांच्या याद्या देखील समोर आल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या: