दसऱ्याला भगवान गडावर येणारच: पंकजा मुंडे
एबीपी माझा वेब टीम | 06 Oct 2016 08:15 AM (IST)
मुंबई: गेल्या काही दिवसांपूर्वी भगवानगडावरील दसरा मेळाव्यावरुन पंकजा मुंडे आणि महंत नामदेवशास्त्री यांच्यामध्ये चांगली जुंपली होती. भगवानगडावरील दसरा मेळावा पंकजा मुंडेंच्या उपस्थितीमध्येच झाला पाहिजे, नाही तर तीव्र आंदोलन करु, असा इशारा वंजारी सेवा संघाच्या वतीनं देण्यात आला होता. तर दुसरीकडे पंकजा मुंडेचे येथे भाषण होणार नाही, अशी भूमिका गडाचे महंत नामदेवशास्त्री सानप यांनी घेतली होती. त्यातच आज पंकजा मुंडेंच्या फेसबूक पेजवरुनही त्या दसरा मेळाव्यासाठी भगवान गडावर जाणार असल्याचं सांगितलंय. त्यामुळे पंकजा मुंड विरुद्ध नामदेव शास्त्री हा संघर्ष वाढणार असल्याची चिन्हे आहेत. भगवान गडावरील दसरा मेळावा आणि गोपीनाथ मुंडे हे समीकरण होतं. मात्र, भगवान गडावर राजकीय भाषण होणार नाही अशी भूमिका भगवानगडाचे महंत नामदेवशास्त्री सानप यांनी घेतल्यानंतर वंजारी सेवा संघानं आक्रमक भूमिका घेतली. गेल्या वर्षी भगवानगडावरील दसरा मेळावा पंकजा मुंडेंच्या उपस्थितीत झाला होता. मात्र, गेल्या काही दिवसात नामदेवशास्त्री आणि पंकजा मुंडे यांच्यामध्ये वाद सुरु झाले. त्यातच आज पंकजा मुंडेंच्या फेसबूक पेजवरुनही त्या दसरा मेळाव्याला येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.