नंदुरबार :  शहादा- दोंडाईचा रस्त्यावरील रिलायन्स पेट्रोलपंपजवळ भीषण अपघात झाला आहे. मजुरांच्या टॅक्टरला ट्रकने धडक दिली. त्यामुळे या अपघातात 6 मजूर जागीच ठार झालेत, तर 17 जण जखमी झाले आहेत. त्यापैकी 7 जण गंभीर आहेत.


 

जखमींवर शहादा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सर्व मजूर शहादा तालुक्यातील मोहिदा गावाचे रहिवाशी आहेत.