Panjabrao Dakh : राज्याच्या अनेक भागात सध्या पावसाचा जोर पाहायला मिळत आहे. तर काही भागात अद्यापही मोठा पाऊस झाला नाही. तर काही भागात पावसामुळं (Rain) जनजीवन विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान, राज्यात पावसाचा जोर किती तारखेपर्यंत राहणार याबाबतची माहिती हवामान अभ्यासक पंजाबराव डख (Panjabrao Dakh) यांनी दिली आहे. राज्यात 22 जूनपर्यंत भाग बदलत पाऊस पडणार असल्याची माहिती पंजाबराव डख यांनी दिली आहे. 


विदर्भात 20 जून पर्यंत पेरणीयोग्य पावसाची शक्यता 


पंजाबराव डख यांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार, महाराष्ट्रात 22 जून पर्यंत पाऊस कायम राहण्याची शक्यता आहे. आज आणि उद्या राज्यातील काही भागांमध्ये पाऊस विश्रांती घेऊ शकतो. मात्र, महाराष्ट्रात सर्वत्र पावसाचा खंड राहणार नसल्याचे पंजाबराव डख म्हणाले. विदर्भात 22 जून पर्यंत पाऊस सुरूच राहणार आहे. पंजाबरावांनी सांगितल्याप्रमाणे विदर्भात 20 जून पर्यंत पेरणीयोग्य पावसाची शक्यता आहे. 


यंदा जून ते सप्टेंबर या चार महिन्यात जोरदार पावसाची शक्यता


यंदा जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या मान्सून काळात जोरदार पावसाची शक्यता आहे. एकंदरीत यंदा गेल्या वर्षी सारखी परिस्थिती राहणार नाही. यंदा एल निनोची स्थिती नाही. त्यामुळं पावसाचं प्रमाण चांगलं राहणार असल्याची माहिती पंजाबराव डख यांनी दिली आहे. 


शेतकऱ्यांनी 100 मिलिमीटर पाऊस झाल्याशिवाय पेरणी करु नये


दरम्यान, ज्या भागात चांगला पाऊस झाला आहे, त्या  भागातील शेतकरी पेरणीच्या कामांना लागले आहेत. मात्र, अनेक भागात पेरणीयोग्य पाऊस झाला नाही. त्यामुळं शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करु नये असं आवाहन कृषी विभागाकडून करण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी 100 मिलिमीटर पाऊस झाल्याशिवाय पेरणी करु नये असे आवाहन कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे.  


मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी


दरम्यान, यावर्षी जून महिन्यात चांगला पाऊस झाल आहे. दरवर्षी जून महिन्याच्या शेवटी किंवा जुलै महिन्याच्या सुरुवातीला महाराष्ट्रात चांगला पाऊस होत असतो. मात्र, यावेळी जून महिन्याच्या सुरुवातीलाच राज्याच्या विविध भागात जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. मान्सून देखील हळूहळू संपूर्ण राज्यात सक्रीय होत आहे. त्यामुळं पुढच्या काही दिवसात म्हणजे 22 तारखेपर्यंत पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात येत आहे. 


महत्वाच्या बातम्या:


100 मिलिमीटर पाऊस झालाय का? शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करु नये, कृषी विभागाचं आवाहन