सोलापूर : ‘पानी’ फांउडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत सोलापूरच्या बार्शी तालुक्यातील सुर्डी गावाने प्रथम पारितोषिक पटकावले आहे. आमिर खान आणि किरण राव यांच्या हस्ते सरपंचांसह ग्रामस्थांनी हा पुरस्कार स्वीकारला.


या स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल सुर्डी गावाला पानी फाउंडेशनकडून 75 लाख रुपये आणि सन्मानचिन्ह देण्यात आलं आहे. पुण्यातील बालेवाडी येथे पाणी फांउडेशनच्या वतीने हा पुरस्कार सोहळा पार पडला.


सोलापूर जिल्ह्यातून 6 तालुक्यांची निवड या स्पर्धेसाठी करण्यात आली होती. त्यामध्ये, बार्शी, करमाळा, उत्तर सोलापूर, माढा, मंगळवेढा आणि सांगोला या तालुक्यांचा सहभाग होता. विशेष म्हणजे सोलापूर जिल्ह्याला 'सुर्डी'च्या रुपाने गेल्या 4 वर्षात पहिल्यांदाच वॉटर कप स्पर्धेत राज्यस्तरीय बहुमान मिळाला आहे. त्यामुळे बार्शी तालुक्यासह जिल्ह्यातून गावकऱ्यांचे अभिनंदन केले जात आहे.


'वॉटर कप' स्पर्धेतील विजेती गावे


प्रथम क्रमांक
सुर्डी गाव (ता. बार्शी जि. सोलापूर)

द्वितीय क्रमांक
पिंपरी जलसेन (ता. पारनेर जि. अहमदनगर)
शिंदी खुर्द (ता. माण जि. सातारा)

तृतीय क्रमांक
आनोरे (ता. अमळनेर जि. जळगाव)
देवऱ्याची वाडी (ता. जि. बीड)
बोरव्हा बुद्रुक (ता. मंगरुळपीर जि. वाशिम)