नाशिक : आषाढी वारीसाठी त्र्यंबकेश्वर येथून संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीने आज हजारो वारकऱ्यांसह पंढरपूरकडे प्रस्थान केले आहे. वारकऱ्यांनी अवघे 10 ते 15 किलोमीटर पार केल्यानंतर पावसाला सुरुवात झाली. परंतु अवघ्या काही वेळात वारकऱ्यांना रेनकोटचे वाटप करण्यात आले. रेनकोट पाहून वारकऱ्यांना सुखद धक्का बसला. दरम्यान यावर्षी विविध पालख्यांद्वारे पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांना 5 लाख रेनकोटचे वाटप केले जाणार असल्याची माहिती स्वयंसेवकांनी दिली.
दरवर्षी आषाढी वारीसाठी वारकरी मोठ्या उत्साहाने पंढरपूरकडे धाव घेतात. परंतु आषाढ महिन्यात महाराष्ट्रात मुसळधार पाऊस कोसळत असतो. त्यामुळे वारकऱ्यांना भर पावसात मार्गक्रमण करावे लागते. या वारीत सहभागी होणारे बहुतांश वारकरी हे शेतकरी, कामगार तसेच मजूर वर्गातील असतात. त्यामुळे बहुतांश वारकऱ्यांना पावसापासून वाचण्यासाठी छत्री किंवा रेनकोट खरेदी करणे परवडणारे नसते. त्यामुळे यावर्षी सरकारने वारकऱ्यांना रेनकोट देण्याता निर्णय घेतला आहे.
दरम्यान आज संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ पालखी सोहळ्यासाठी हजारो वारकरी त्र्यंबकेश्वरमध्ये दाखल झाले होते. सकाळी निवृत्तीनाथांच्या पादुका मंदिराबाहेर आणण्यात आल्या. पूजा, आरती, अभंग आणि भजनाचा कार्यक्रम झाल्यानंतर निवृत्तीनाथ महाराज की जय आणि ज्ञानोबा माऊली तुकारामचा जयघोष करत पालखी पंढरपूरकडे रवाना झाली आहे.
पाऊस आला, भिजण्यापूर्वीच वारकऱ्यांना रेनकोट मिळाले
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
18 Jun 2019 07:25 PM (IST)
आषाढी वारीसाठी त्र्यंबकेश्वर येथून संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीने आज हजारो वारकऱ्यांसह पंढरपूरकडे प्रस्थान केले आहे. वारकऱ्यांनी अवघे 10 ते 15 किलोमीटर पार केल्यानंतर पावसाला सुरुवात झाली. परंतु अवघ्या काही वेळात वारकऱ्यांना रेनकोटचे वाटप करण्यात आले.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -