सोलापूर: पगारवाढीसाठी घरदार सोडून आंदोलन करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार पंढरपुरात समोर आला.

ड्रायव्हर-कंडक्टर हे ड्युटीनिमित्त आपल्या जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात गेले, पण संपामुळे ते त्या-त्या आगारात अडकून पडले.

त्यामुळे त्यांना एसटीच्या विश्रामगृहातच तळ ठोकावा लागला. पण संपादरम्यान विश्रामगृहात आराम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना चक्क अर्धनग्न अवस्थेत प्रशासनानं बाहेर काढलं.

संपावरील कर्मचारी एसटीच्या विश्रांतीगृहाचा वापर करत होते. यावेळी परिवहनचे अधिकारी अचानक विश्रांतीगृहात धडकले आणि त्यांनी या कर्मचाऱ्यांना सरळ विश्रांतीगृहाच्या बाहेर हाकललं.

विशेष म्हणजे या अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांना आपल्या अंगावर कपडेही घालू दिले नाहीत. तसेच या विश्रांतीगृहाला कुलूप लावल्यानं कर्मचाऱ्यांचं सामानही आता अडकूनही पडलंय.

त्यामुळं आता या कर्मचाऱ्यांवर उघड्या अंगानीशी बाहेर बसण्याची वेळी आली. महामंडाळाच्या या असंवेदनशील कारवाईवर एसटी कर्मचाऱ्यांनी संताप व्यक्त केलाय.

इंग्रजांपेक्षा सरकार वाईट

पंढरपूर प्रमाणे राज्यभरातील सर्वच आगारात शेकड्याने चालक वाहक अडकून पडले असून त्यांच्या भोजनाची व्यवस्था स्थानिक कर्मचारी करीत आहेत. मात्र संपवरील हे कर्मचारी एसटीच्या विश्रांतीगृहाचा वापर मुक्कामासाठी करीत होते.

जर संपावर जायचे असेल तर नियमाप्रमाणे एसटीचे विश्रांतीगृह वापरायचे नाही, असा नियम दाखवत, बाहेरगावच्या कर्मचाऱ्यांना ऐन दिवाळीत अर्धनग्न अवस्थेत बाहेर काढण्यात आलं.

महामंडळाच्या या निर्णयामुळे संपकरी कर्मचाऱ्यांचा संताप वाढला असून, इंग्रजांपेक्षा वाईट अवस्था या सरकारने केल्याचा आरोप कर्मचाऱ्यांकडून केला जात आहे.

संबंधित बातम्या

एसटी संप चौथ्या दिवशीही सुरुच

ब्लॉग : लालराणीचा राजा उपाशी


“एसटी कर्मचाऱ्यांना विश्रांतीगृहाबाहेर काढा आणि गुन्हे दाखल करा” 

उद्धव ठाकरेंचं एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष का? : इंटकचा सवाल 

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात आता मुख्यमंत्री हस्तक्षेप करणार? 

प्रशासन एसटी संप चिघळवतंय: इंटक 

अन्य राज्यांच्या तुलनेत एसटी कर्मचाऱ्यांचा पगार किती?