पंढरपूर : राष्ट्रवादीचे फायर ब्रँड आमदार म्हणून ओळख असलेल्या दिवंगत आमदार भारत भालके यांच्या अकाली मृत्यूमुळे रिक्त झालेल्या जागेवर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू झाली असून भालकेंची उर्वरित टर्ममध्ये त्यांची राहिलेली सर्व कामे पूर्ण करण्यासाठी हा पर्यायावर विचार सुरू झाला आहे. भारत भालके हे थेट जनतेचे आमदार म्हणून जशी त्यांची ओळख होती. तसे त्यांनी त्यांचा वारसदार ही तयार केलेला नव्हता. त्यांच्या अकाली जाण्याने अनेक प्रश्न तयार झाले असून त्यांच्या ताब्यात असलेला विठ्ठल कारखानाही आधी अडचणीतून बाहेर काढावा लागेल असे स्पष्ट वक्तव्य शरद पवार यांनी केले होते. त्यानुसार भालके यांचे पुत्र भगीरथ यांना नुकतेच भालकेंच्या जागी कारखान्याचे अध्यक्ष केले आहे.
पोटनिवडणुकीमध्ये भगीरथ यांना उमेदवारी दिली तर विधान परिषद आमदार प्रशांत परिचारक व उद्योगपती समाधान वाटाडे यांच्यातील एकसोबत लढत होऊ शकेल. जनतेची सहानुभूती जरी भगीरथ यांच्यासोबत असली तरी अनुभव नसल्याने पक्ष धोका पत्करू शकत नाही. त्यामुळेच शरद पवार यांनी उमेदवारी बाबत वक्तव्य करणे टाळत संभ्रम ठेवला आहे.
याच पद्धतीने फडणवीस यांनीही यावर भाष्य करणे टाळल्याने वेगळ्या हालचाली सुरू असल्याचे राजकीय अभ्यासक बोलत आहेत पार्थ यांना उमेदवारी दिल्यास राष्ट्रवादीतून भाजपत गेलेले परिचारक निवडणूक लढवणार नाहीत आणि भालके व परिचारक यांच्यामुळे एकतर्फी विजय मिळवतील असा पार्थ राष्ट्रवादीचा चेहरा आहे. यामुळे पार्थ पवार यांचे तात्पुरते पुनर्वसन होईल आणि पुढच्या वेळेला पुन्हा भगीरथ यांना राष्ट्रवादी उमेदवारी देईल. परिचारक यांना विधानपरिषद उमेदवारी देऊन समतोल साधण्याच्या हालचाली सुरू झाल्याने पंढरपूर मंगळवेढा मतदार संघातील भालके यांची जागा कोण घेणार? हे शरद पवार हेच नेहमीच्या धक्कातंत्र वापरून जाहीर करतील अशी चर्चा आहे.
पार्थ पवारांना उमेदवारी द्या, अमरजित पाटील यांची मागणी
दिवंगत आमदार भारत भालके यांच्या अकाली मृत्यूमुळे रिक्त झालेल्या जागेवर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांना उमेदवारी देण्याची मागणी कर्मवीर औदुंबर पाटील प्रतिष्ठानचे अध्यक्ष अमरजित पाटील यांनी केली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून मंगळवेढ्यात 35 गावांचा पाण्याचा प्रश्न , पंढरपूरची MIDC अशा मागण्या पूर्ण न झाल्याने पार्थ पवार यांना उमेदवारी दिल्यास अनेक वर्षाचे प्रश्न सुटतील असे वाटत असल्याने अमरजित पाटील यांनी शरद पवार यांच्याकडे पार्थ यांच्या उमेदवारीबाबत मागणी केली आहे.