पंढरपूर : कोरोनाच्या वाढत्या संकटामुळे यंदा माघी यात्रा प्रशासनाने रद्द करताना एकाही भाविकाला पंढरपूर शहरात येऊ न देण्यासाठी त्रिस्तरीय नाकेबंदी सुरु केली आहे. आलेल्या भाविकांची वाहने परत पाठवण्यास सुरुवात झाली आहे. सोलापूर जिल्हा सीमेवर पहिली नाकेबंदी करण्यात आली असून दुसरी नाकेबंदी पंढरपूर तालुक्याच्या सीमेवर लावण्यात आली आहे. या दोन्ही नाकेबंदी चुकवून आलेली वाहने पंढरपूर शहराच्या सीमेवर अडवून त्यांची तपासणी केली जात आहे व भाविकांची वाहने पुन्हा परत पाठवण्यास सुरुवात केली आहे. जी वाहने केवळ कळस दर्शन घेऊन लगेच परत जाणार आहेत, अशा भाविकांचे मोबाईल नंबरच्या नोंदी पोलीस ठेवत आहेत.


पंढरपुरात 24 तास संचारबंदी
कोरोनाच्या संकटाचा फटका नवीन वर्षातील वारकरी संप्रदायाच्या माघी यात्रेलाही बसला आहे. आज रात्री 10 वाजल्यापासून 24 फेब्रुवारी सकाळपर्यंत विठ्ठल मंदिर भाविकांसाठी बंद राहणार आहे. पंढरपूर शहर आणि परिसरातील 10 गावांत संचारबंदी घोषीत करण्यात आली आहे. या यात्रेसाठी भाविक अथवा दिंड्यानी येऊ नये म्हणून त्रिस्तरीय नाकेबंदी लावण्यात आली असून पोलिसांचा मोठा फौजफाटा शहरात दाखल झाला आहे.


Maghi Yatra |माघीसाठी पंढपुरात हजारो दिंड्या दाखल; पोलिसांकडून 1200 पेक्षा जास्त मठ व धर्मशाळांना नोटीस


कोरोनाच्या संकटामुळे गेल्या वर्षी चैत्री, आषाढी आणि कार्तिकी या वारकरी संप्रदायाच्या यात्रा रद्द करण्यात आल्या होत्या. तब्बल 10 महिन्यानंतर दिवाळी पाडव्याला विठ्ठल मंदिराची दारे भाविकांना मर्यादित स्वरूपात खुली झाली होती. मात्र, नवीन वर्षात पुन्हा कोरोनाने डोकं वर काढल्याने माघी यात्राही भाविकांसाठी रद्द करण्याचा निर्णय शासनाला घ्यावा लागला आहे. या यात्रेच्या काळात कोणत्याही दिंडी अथवा भाविकांना पंढरपूरमध्ये प्रवेश दिला जाणार नाही. उद्या रात्रीपासून 24 तासांची संचारबंदी लावण्यात आली असल्याने रस्त्यावर कोणालाही बाहेर पडत येणार नाही. यापूर्वी शहरातील जवळपास 1200 मठ आणि धर्मशाळेत आलेल्या भाविकांना यात्रा काळात निवास करण्याची परवानगी देऊ नये यासाठी पोलिसांनी सर्व मंथन नोटीस बजावल्याने आता वारकरी संप्रदाय आणि पोलीस यांच्यात संघर्ष निर्माण होऊ लागला आहे. जे भाविक यापूर्वीच शहरात आलेत त्यांना बाहेर काढू नये असा इशारा आज बंडातात्या कराडकर यांनी दिला आहे.


Pandharpur Maghi Yatra | माघी यात्रेवर कोरोनाचं सावट, आज रात्रीपासून दोन दिवसांसाठी देऊळ बंद