मुंबई : राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीत भाजपचे समाधान आवताडेंनी 3733 मतांनी बाजी मारली. दिवंगत भाजप भालके यांचे पुत्र आणि राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके यांचा आवताडेंनी पराभव केला. मतमोजणीत सुरुवातीपासूनच समाधान आवताडे यांनी आघाडी घेतली होती, ती विजयापर्यंत कायम राखली. पंढरपूर विधानसभा पोटनिवडणूक निकाल अपेक्षेप्रमाणे अतिशय घासून झाला. अनपेक्षितपणे भाजपने मारलेली मुसंडी राष्ट्रवादीला धक्का देणारी आहे. 


या विजयावर प्रतिक्रिया देताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले की,  समाधान आवताडे यांना जनतेने दिलेला कौल हा महाविकास आघाडीच्या भ्रष्टाचारी आणि भोंगळ कारभाराला जनतेने दाखविलेला आरसा आहे.  फडणवीस म्हणाले की, पंढरपूरच्या जनतेने भाजपावर विश्वास दाखविला आहे. हा विजय आम्ही विठुरायाला समर्पित करतो. या मतदारसंघातील जनतेने महाविकास आघाडीच्या भ्रष्टाचारी आणि भोंगळ कारभाराला आरसा दाखविण्याचे काम केले आहे. 


पंढरपूर पोटनिवडणूक 2021 : भाजपचे समाधान आवताडे विजयी; भगीरथ भालकेंच्या पराभवाची कारणे?


त्यांनी म्हटलं की, सत्ताधार्‍यांनी साम-दाम-दंड-भेद, शक्ती आणि पैशाचा प्रचंड दुरूपयोग केला. पण, जनतेने भारतीय जनता पार्टीच्या बाजुने कौल दिला. कोरोनाच्या काळात या सरकारने कुणालाच मदत नाही. बारा-बलुतेदारांमध्ये त्यामुळे प्रचंड नाराजी आहे. वीज तोडणीने तर जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले. या सर्व नाराजीचा एकत्रित परिणाम झाला. हा विजय विठ्ठलाचा आशीर्वाद आहे. त्यामुळे हा त्यांच्याच चरणी आम्ही समर्पित करतो, असं ते म्हणाले. 


आवताडेंच्या विजयाची ही आहेत प्रमुखं कारणं


राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीत भाजपचे समाधान आवताडेंनी 3733 मतांनी बाजी मारली. दिवंगत भाजप भालके यांचे पुत्र आणि राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके यांचा आवताडेंनी पराभव केला. मतमोजणीत सुरुवातीपासूनच समाधान आवताडे यांनी आघाडी घेतली होती, ती विजयापर्यंत कायम राखली. पंढरपूर विधानसभा पोटनिवडणूक निकाल अपेक्षेप्रमाणे अतिशय घासून झाला. अनपेक्षितपणे भाजपने मारलेली मुसंडी राष्ट्रवादीला धक्का देणारी आहे. 



  • मंगळवेढ्याचा स्थानिक उमेदवार व भूमिपुत्र म्हणून समाधान आवताडे यांना फायदा झाला.

  • एक उद्योजक म्हणून राजकारणात आलेल्या आवताडे यांच्याकडे आर्थिक बाजू भक्कम आहे. 

  • त्यांच्या जोडीला भाजपने विधानपरिषद आमदार प्रशांत परिचारक यांची जोडून दिलेली साथ त्यांना पंढरपूर आणि मंगळवेढा भागात खूप फायदेशीर ठरली.

  • परिचारिकांच्या पांडुरंग परिवाराने संपूर्ण ताकतीने केलेला प्रचार आणि मतदान यामुळे अवताडे याना यंदा पंढरपुरात चांगली मते मिळाली. 

  • मंगळवेढा भागातही परिचारक समर्थकांची मते मिळाल्याने विजयाची अशा पल्लवित झाल्या आहेत. 

  • विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या 6 जंगी सभा हा त्यांचा टर्निंग पॉईंट ठरला.

  •  प्रचाराच्या शेवटच्या दोन दिवसात अतिशय नियोजनबद्ध रीतीने झालेले काम त्यांना उपयोगी ठरले.