Pandharpur: विठ्ठल-रुक्मिणीच्या चरणी भक्तांनी यंदाच्या माघी यात्रेत (Maghi Yatra) भरभरून दान दिले असले तरी, गेल्या वर्षीच्या तुलनेत उत्पन्नात तब्बल 47 लाख रुपयांची घट झाली आहे. मंदिराच्या तिजोरीत यंदा तीन कोटी तीन लाख रुपयांचे उत्पन्न जमा झाले आहे, मात्र भाविकांची गर्दी वाढूनही आर्थिक संकलन घटल्याने चर्चेला उधाण आले आहे. माघ शुद्ध प्रतिपदा (30 जानेवारी) ते माघ शुद्ध पौर्णिमा (12 फेब्रुवारी) या कालावधीत देशभरातून लाखो भाविकांनी पंढरपूरात हजेरी लावली. भाविकांनी रोख रक्कम, सोन्या-चांदीचे दागिने आणि विविध माध्यमांतून देणग्या अर्पण केल्या. विविध देणग्यांच्या माध्यमातून एकूण 3 कोटी 3 लाखाचे उत्पन्न मिळाल्याची माहिती मंदिरे समितीचे कार्यकारी अधिकारी यांनी दिली.

  • हुंडीपेटीमध्ये: ₹86,48,152
  • रोख देणगी: ₹80,34,128
  • लाडू प्रसाद विक्री: ₹40,81,000
  • भक्तनिवास उत्पन्न: ₹36,83,969
  • श्रींच्या चरणी रोख अर्पण: ₹32,33,420
  • पूजा आणि धार्मिक सेवा: ₹8,88,800
  • सोन्या-चांदीची भेट: ₹10,39,707
  • इतर उत्पन्न (फोटो, महावस्त्र, शेणखत, गोमुत्र, मोबाईल लॉकर इ.): ₹6,97,640

गेल्या वर्षीपेक्षा घट कशी?

मागील वर्षी माघी यात्रेत 3 कोटी 50 लाख रुपये मंदिराच्या तिजोरीत जमा झाले होते. मात्र, यंदा मोठी गर्दी असूनही केवळ 3 कोटी 3 लाख रुपये संकलित झाले. परिणामी, 47 लाख 15 हजार 703 रुपयांची घट झाली आहे. भाविकांची उपस्थिती वाढली असली तरी, मंदिरे समितीच्या उत्पन्नात घट होण्याची संभाव्य कारणे काय? रोख दानाचा कमी वापर: आता भक्त डिजिटल देणगीकडे वळत असल्याने, मंदिर समितीच्या पारंपरिक उत्पन्नाच्या स्रोतांवर परिणाम होत आहे. देणग्यांपेक्षा सेवा आणि सुविधा वापरण्याचा कल: भाविक लाडू, पूजासामग्री आणि भक्तनिवासासाठी पैसे खर्च करत असले तरी, थेट देणगी देण्याचे प्रमाण घटले आहे. यावर्षीचे उत्पन्न गेल्यावर्षी माघी यात्रेच्या तुलनेत जवळपास 47 लाख रुपयाने घटल आहे. . गेल्या वर्षीच्या माघी यात्रेत मंदिराच्या तिजोरीमध्ये तब्बल तीन कोटी 50 लाख रुपये जमा झाले होते. मात्र यावर्षी मागे यात्रेत तीन कोटी तीन लाख रुपये जमा होऊ शकले आहेत. यावर्षी मोठ्या प्रमाणात यात्रा भरूनही मागील यात्रेच्या तुलनेत 4715703/- इतक्या रुपयांची घट झाल्याचे दिसून येत आहे.

माघी एकदशीला भाविकांचा दानधर्माचा कल घटताच

वारकरी संप्रदायातील महत्त्वाची मानली जाणाऱ्या माघी वारीचा महत्त्वाचा व मुख्य दिवस म्हणजे माघी एकादशीसाठी लाखो भाविक खेडोपाड्यातून गावोगावातून पांडुरंगाच्या दर्शनाला आले होते.माघी एकादशी निमित्त विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी चंद्रभागेच्या तीरावर हजारोंच्या संख्येने भाविक पोहोचले. चंद्रभागेत स्नान करून दानधर्म करण्याकडे भक्तांचा कल असतो . मात्र, यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत दानधर्माचा कल घटताच असल्याचे पहायला मिळाले.

हेही वाचा:

Ladki Bahin Yojana: पडताळणी पूर्ण झाल्यावरच लाडक्या बहिणींना पैसे? साडेपाच लाख लाभार्थी झाले कमी, लाडक्या बहिणींना फेब्रुवारीचा हफ्ता उशिरा मिळण्याची शक्यता