पंढरपूर : लाखो वारकरी पायी येणार्‍या संत ज्ञानेश्‍वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी मार्गाचे भूमिपूजन 8 नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हर्च्युअल होणार आहे.  8 नोव्हेंबर रोजी दुपारी 3 वाजता पूर्वी उभारलेल्या मंडपात हा कार्यक्रम होणार असून मोदी दिल्ली येथून या कार्यक्रमात सहभागी होतील आणि शुभारंभ करणार आहे. यावेळी नितीन गडकरी , मुख्यमंत्री उद्धव ठाकरे , अजित पवार , देवेंद्र फडणवीस , चंद्रकांत पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहे. कार्तिकी यात्रेच्या गडबडीत वारकऱ्यांना त्रास होऊ नये म्हणून पंतप्रधान यांच्या हस्ते ऑनलाईन  भूमिपूजन करण्याचा काढला तोडगा काढला आहे. 


आषाढी वारीसाठी आळंदी व देहूमधून लाखो भाविक पंढरीच्या वाटेवर असतात. हा भक्तीचा सोहळा महाराष्ट्राचे वैभव असून श्रद्धेचा विषय आहे. लाखो भाविक ज्या मार्गावरून चालत येतात, तो रस्ता भव्य व सुंदर असावा या हेतूने नितीन गडकरी यांनी पालखी मार्गाचे विस्तारीकरण करण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार राष्ट्रीय महामार्ग अंतर्गत दोन्ही रस्त्यांचे काम सुरू झाले आहे. एकूण 8 हजार कोटी रुपयांच्या या प्रकल्पाचे जवळपास 40 टक्के काम पूर्ण झाल्यावर आता भूमिपूजनाचा घाट घालून वारकरी संप्रदायाला खुश करण्याचे काम सुरु आहे. हा रस्ता वारकर्‍यांसाठी करण्यात आला आहे. 


वारकरी संप्रदायाला खुश करण्यासाठी पालखी मार्गाचे भूमिपूजन आता पंतप्रधान करणार


तब्बल दोन वर्षानंतर पंढरपूरमध्ये आता वारकरी संप्रदायाची कार्तिकी यात्रा भरविण्याचा हालचाली सुरु असून 15 नोव्हेंबर रोजी कार्तिकी एकादशीचा सोहळा आहे. मात्र, पंतप्रधानांचा दौरा झाला असता तर  याचा मनस्ताप वारकरी संप्रदायाला सोसावा लागला असता. त्यामुळे आता पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑनलाईन उपस्थित राहणार आहे. 


संत ज्ञानेश्‍वर महाराज पालखी मार्गासाठी 6 हजार 693 कोटी तर संत तुकाराम महाराज पालखी मार्गासाठी 3 हजार 798 कोटी असा जवळपास दहा हजार कोटी रूपयाचा निधी या दोन्ही रस्त्यांसाठी राष्ट्रीय महामार्ग खात्याकडून मंजूर करण्यात आला आहे.