Pandharpur and Belgaum By Election Results 2021 Live Updates : प्रतिष्ठेच्या पंढरपूर पोटनिवडणूकीत भाजपच्या समाधान आवताडे यांचा विजय

Pandharpur By Election Belgaum, Lok Sabha Results 2021 LIVE Updates: पंढरपूर मंगळवेढा पोटनिवडणुकीची मतमोजणी आज सकाळी आठ वाजता पंढरपूर येथील शासकीय गोदामात सुरु होणार आहे. बेळगाव लोकसभा पोट निवडणुकीची मतमोजणीला आज सुरुवात होत असून भाजपच्या मंगला अंगडी, काँग्रेसचे सतीश जारकीहोळी आणि समितीचे शुभम शेळके हे निवडणुकीतील प्रमुख उमेदवार आहेत.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 02 May 2021 07:19 AM

पार्श्वभूमी

अत्यंत चुरशीच्या झालेल्या पंढरपूर पोटनिवडणुकीसाठी रविवारी सकाळी आठपासून मतमोजणीपंढरपूर मंगळवेढ्याचे दिवंगत आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर रिक्त जागी झालेल्या पोटनिवडणुकीच्या निवडणुकीची मतमोजणी आज सकाळी आठ वाजता पंढरपूर येथील शासकीय गोदामात...More

Pandharpur Election Results 2021 : पंढरपूर पोटनिवडणूकीत समाधान आवताडे यांचा विजय

Pandharpur Election Results 2021 LIVE UPDATE : संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेल्या पंढरपूर पोट निवडणुकीत भाजपचे समाधान आवताडे विजयी झाले असून राष्ट्रवादीच्या भगीरथ भालके यांना धक्का बसला आहे. 



  • अंतिम निकाल


समाधान आवताडे
ईव्हीएम मतं : 107774
पोस्टल मतं : 1676
एकूण 109450



भगीरथ भालके
ईव्हीएम मतं : 104271
पोस्टल मतं : 1446
एकूण मतं : 107717


एकूण 3733 मतांनी समाधान अवताडे विजयी