पालघर  : पालघर जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकीत  पंधरा ही जागांचे निकाल हाती आले असून शिवसेना 5 , भाजपा 4 , राष्ट्रवादी 5 तर माकपा ला एका जागेवर विजय मिळवण्यात यश आले आहे.  काँग्रेसला मात्र जिल्ह्यात एकाही जागेवर खात उघडता आले नाही. शिवसेनेला सर्वाधिक जागा मिळवण्यात यश आलं असलं तरी वणई गटातून शिवसेना खासदार राजेंद्र गावित यांच्या चिरंजीवांचा झालेला दारूण प्रभाव हा शिवसेनेला मोठा धक्का मानला जातो.


 शिवसेना खासदार राजेंद्र गावित यांचा मुलगा रोहित गावित याला शिवसेनेकडून वणई गटातून उमेदवारी देण्यात आली होती . मात्र सत्ताधारी असतानादेखील गावितांना ही जागा राखण्यात अपयश आल आहे. मुख्य लढतीतही रोहित गावित नसल्यान गावीतांवर मोठी नामुष्की ओढवलेली पाहायला मिळाली. तर दुसरीकडे पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकीत  शिवसेना - 5, भाजप - 3 , राष्ट्रवादी - 2 बविआ - 3, तर मनसेला एका जागेवर विजय मिळवण्यात यश आले आहे. वाडा तालुक्यात भाजप - मनसे चार जागांवर हातमिळवणी केली होती मात्र त्या पैकी एका ही जागेवर यश मिळवण्यात या दोन्ही पक्षांना यश आलं नाही.


पालघर  तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती गणात शिवसेनेने निर्विवाद वर्चस्व राखत आपला गड कायम ठेवला आहे. जिल्हा परिषदेच्या दोन्ही गटात सेनेने विजय मिळवला असून  पंचायत समितीच्या नऊ गणांपेकी चार गणात विजय संपादन  करून पालघर तालुका हा सेनेचा गड आहे. हे  पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.



 


  पालघर जिल्हा परिषदेच्या दोन गटात विजय संपादन केला आहे. नंडोरे देवखोप गटातून  भारतीय जनता पक्षाला नंबर  एक वरून सरळ तीन नंबर वर ढकलत सेनेने विजयश्री मिळविला आहे जिल्हा परिषद गटात निवडणूक गट क्रमांक 47 मधून सावरे एम्बुर  गटातून शिवसेनेच्या विनया पाटील यांनी बहुजन विकास आघाडी च्या प्रांजल पाटील यांचा 1635 मतानी पराभव करत सलग दुसऱ्यांदा विजय संपादन केला. गट क्रमांक 48 देवखोप नंडोरे गटातून अनिता पाटील यांनी राष्ट्रवादीच्या कविता खटाळ यांचा 867 मतांनी पराभव केला. मागच्या निवडणुकीत निता पाटील यांचा पराभव झाला होता त्यांच्या या विजयाने त्यांनी पराभवाची परतफेड केली आहे. 


पंचायत समितीचे नऊ जागांसाठी झालेल्या लढतीत चार शिवसेना, दोन भाजपा, आणि राष्ट्रवादी, बविआ व मनसेला 1 जागा प्राप्त झाली आहे. गण क्रमांक 76 नवापूर येथून राष्ट्रवादीचे मिलिंद वडे यांनी शिवसेनेचे भरत पिंपळे यांचा 96 मतांनी पराभव केला आहे तर गण क्रमांक 77  सालवड तिथे भाजपाने विजय प्राप्त केला आहे. मेघा पाटील यांनी सेनेच्या तनुजा राऊत यांच्या 445 मताने पराभव केला आहे. गण क्रमांक 83 सरावली ( अवधनगर ) येथून सेनेच्या ममता पाटील यांनी भाजपाच्या निर्मिती संखे यांचा 643 मतांनी पराभव केला आहे. गण क्रमांक 84 मध्ये भाजपाच्या रेखा सपकाळ यांनी सेनेच्या वैभवी राऊत यांच्या 181 मतांनी पराभव करत सेनेच्या गडाला हादरा दिला आहे. गण क्रमांक 87 मान इथून मनसेच्या तृप्ती पाटील यांनी  बविआ च्या प्रतिक्षा चुरी यांचा 1,195 मताने पराभव केला आहे. गण क्रमांक 88 शिगाव खुताड येथे बाविआचे अनिल काठ्या यांनी सेनेच्या निधी बांदिवडेकर यांचा 92 मतांनी पराभव केला गण क्रमांक 89 बराहणपुर इथून सेनेच्या किरण पाटील यांनी बविआचे दीपेश पाटील यांचा 1170 मतांनी पराभव केला. गण क्रमांक 91 कोंढाणमधून सेनेचे कमळाकर अधिकारी यांनी काँग्रेसचे संजय अधिकारी यांना 1847 मतांनी पराभव पत्करावा लागला. तर गण क्रमांक 106 नवघर घाटीम गणात सेनेच्या कामिनी पाटील यांनी बवीआ च्या प्रमिला पाटील यांचा 654 मतांनी पराभव करत बवीआच्या गडाला सेनेने जोरदार धक्का दिला आहे.


पालघर तालुका जिल्हा परिषद व पंचायत समिती च्या पोटनिवडणुकीत सेना भाजपा बहुजन विकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस मार्क्सवादी कम्युनिस्ट या पक्षाने निवडणुका लढविल्या होत्या. मात्र काँग्रेस व मार्क्सवादी कम्युनिस्ट यांना एकही जागा मिळाली नाही त्यात मागच्या निवडणुकीत हे काँग्रेसला एकही जागा मिळाली नव्हती आताही काँग्रेसचे अस्तित्व संपले आहे.


 डहाणू तालुक्यात भाजपने 4 पैकी 3 जि.प.गटात विजय मिळवून वर्चस्व कायम राखले तर एका गटात राष्ट्रवादी काँग्रेसने विजय मिळवला. तलासरी तालुक्यातील एकमेव उधवा गटात माकपच्या उमेदवाराने आपली जागा कायम ठेवण्यात यश मिळवले.पंचायत समितीच्या दोन गणांत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस ने मागच्या निवडणूकितील आपली एक एक जागा कायम राखली.


पालघर जि.प.च्या 15 जागा आणि पं. स.च्या 14 जागांसाठी काल पार पडलेल्या पोटनिवडणूकीत डहाणू तालुक्यातील एकूण 4;गटांपैकी बोर्डी,सरावली आणि वणई या 3 गटांत भाजपचे उमेदवार विजयी झाले तर कासा गटात राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराने सरशी साधली. सरावली पं. स.गण भाजप तर ओसरविरा गणांत राष्ट्रवादी काँग्रेसने मागच्या वेळची आपली जागा कायम राखण्यात यश मिळवले.तलासरी तालुक्यातील एकमेव उधवा जि.प.गटात माकपचे अक्षय देवणेकर यांनी भाजपचे नरहरी निकुंभ यांचा सुमारे 622 मतांनी पराभव करीत विजय मिळवला.


वणई गटात शिवसेनेचे खासदार राजेंद्र गावित यांचे सुपुत्र रोहित राजेंद्र गावित यांना धक्कादायक पराभवाला सामोरे जावे लागले. भाजपचे पंकज कोरे यांना 3654 ,काँग्रेसच्या वर्षा वायेडा यांना 3242  तर शिवसेनेचे रोहित गावित यांना 2356  मतं मिळून तिसऱ्या स्थानावर समाधान मानावं लागले.बोर्डी गटात भाजपच्या ज्योती पाटील यांना 5283 तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या उन्नती राऊत यांना 4867  मते मिळाली.भाजपच्या ज्योती पाटील यांनी राष्ट्रवादी च्या उन्नती राऊत यांचा 416 मतांच्या फरकाने पराभव केला.


कासा गटात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या लतिका बालशी यांना 5312  तर शिवसेनेच्या सुनीता कामडी यांना 2725  मतं मिळाली.लतिका बालशी यांनी 2587 मतांची आघाडी घेत मोठा विजय मिळवला. सरावली गटात भाजपचे सुनील माच्छी यांना 4111  तर माकपचे रडका कालांगडा यांना 3616  एकूण मतं मिळाली. इथे भाजपने 495 मतांनी विजय मिळवला.


डहाणू तालुक्यातील दोन पंचायत समिती गणांत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसने मागच्या निवडणुकीतली आपली एक एक जागा कायम राखण्यात यश मिळवले.
ओसरविरा गणांत भाजपचे अजय गुजर यांनी माकपचे महेंद्र मेऱ्या यांचा 400 मतांनी पराभव केला तर ओसरविरा गणांत राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्वाती राऊत यांनी काँग्रेसच्या उमेदवार संगीता कोरडा यांच्यावर 994 मतांनी विजय मिळवला.


जिल्हा परीषदेच्या पोटनिवडणुकीत मोखाडा तालुक्यातील आसे गटातून राष्ट्रवादीचे हबीब शेख तर पोशेरा गटातून शिवसेनेच्या सारीका निकम विजयी झाले आहेत जिल्ह्यात कोठेही न झालेली आघाडी मोखाड्यात झाल्याने याठिकाणी भाजपाचा धुव्वा उडाला आहे यावेळी आमदार सुनिल भुसारा यांनी या विजयानंतर मतदारांचे आभार मानत या आघाडी बद्दल राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड आणि शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांचे आभार मानले आहेत.मोखाडा तालुक्यातील या दोन्ही जागा गत साली बिनविरोध निवडून येवून याठिकाणी पोशेरा मध्ये भाजप आणि आसे मध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार होते मात्र या पोटनिवडणुकीत भाजपाने हि जागा गमावली आहे.
     
आसेमधून भाजपाचे उमेदवार जयराम निसाळ यांना 4 हजार 14  तर राष्ट्रवादीचे हबीब शेख यांना 5 हजार 675 मते पडली यानुसार शेख हे 1 हजार 634 मतांनी विजयी झाले आहेत मात्र या गटातील हि निवडणूक एकतर्फी झाल्याचे एकूण चित्र होते दुसरीकडे पोशेरा गटात मात्र शेवटच्या फेरीपर्यंत चुरशीची निवडणूक पहावयास मिळाली या गटात भाजपाच्या किशोरी गाटे यांना 3 हजार 986 मते मिळाली तर शिवसेनेच्या सारीका निकम यांना 4 हजार 313 मते मिळाली यानुसार 327 मतांनी निकम यांचा विजय झाला आहे.मोखाडा तालुक्यातील या दोन्ही जागांवर शिवसेना राष्ट्रवादीची आघाडी झाली होती.


  जिल्हा परिषदेच्या वाडा तालुक्यातील 5 वाडा पंचायत समितीच्या 1 जागेचा निकाल बुधवारी जाहीर झाला असून वाड्यात राष्ट्रवादी 3 व सेना 2 जागी विजयी झाली आहे.अनेक ठिकाणी कडवे आव्हान देत भाजपाला मात्र पुन्हा एकदा सर्वच जागी पराभव चाखावा लागला आहे.  पंचायत समिती सापणे बु. गणातदेखील सेनेचा उमेदवार विजयी झाला आहे. जिल्हा परिषदेच्या पोट निवडणुकीत झालेल्या अटीतटीच्या लढतीत वाडा तालुक्यातील गारगाव गटात राष्ट्रवादीच्या रोहिणी शेलार विजयी झाल्या असून त्यांना 6755 मते मिळाली असून त्यांनी सेनेच्या निलम पाटील यांचा 1842 मतांनी पराभव केला. अबिटघर गटात राष्ट्रवादीच्या भक्ती वलटे विजयी झाल्या असून त्यांना 3679 मते मिळाली, अटीतटीच्या लढतीत भाजपाच्या मेघना पाटील यांचा अवघ्या 21 मतांनी पराभव केला.
 
मोज गटात शिवसेनेचे अरुण ठाकरे 5495 मते मिळवीत विजयी झाले असून त्यांनी भाजपाच्या आतिश पाटील यांचा 911 मतांनी पराभव केला. पालसई गटात सेनेच्या मिताली बागुल यांचा 5329 मते मिळवीत विजय झाला असून त्यांनी भाजपाच्या धनश्री चौधरी यांचा 1291 मतांनी पराभव केला. मांडा गटात रखडलेल्या मतमोजणीत 4114 मते मिळवून राष्ट्रवादीच्या अक्षता चौधरी विजयी झाल्या असून त्यांनी भाजपाचे राजेंद्र पाटील यांचा 346 मतांनी पराभव केला. पंचायत समिती सापने बु. गणात 2897 मते मिळवून सेनेच्या दृष्टी मोकाशी विजयी झाल्या आहेत.


गारगाव व अबिटघर गटात सेनेने आपली ताकत पणाला लावली असतांनाही राष्ट्रवादीने मुसंडी मारली आहे. भाजपाचे केंद्रीय पंचायतराज मंत्री व खासदार कपिल पाटील यांनीही प्रतिष्ठा पणाला लावली असूनही वाडा तालुक्यात भाजपाचा पुन्हा एकदा सुपडासाफ झाल्याने नामुष्की पदरात आली आहे. तर विक्रमगड तालुक्यातील आलोंडे या एका जिल्हा परिषद गटासाठी निवडणूक पार पडली यामध्ये भाजपाच्या संदीप पावडे यांनी राष्ट्रवादीचे विपुल पाटील यांचा पराभव केला या ठिकाणी भाजप राष्ट्रवादी आणि शिवसेना अशी लढत झाली