Palghar Virar News : विरारमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका शेतकऱ्याची केळीची बाग अज्ञात व्यक्तीने तोडून टाकली आहे. विरार पश्चिमेच्या अर्नाळा समुद्र किनाऱ्यालगत क्षितिज रिसॉर्टच्या बाजूला शेतकऱ्यांची केळीची बाग होती. सुभाष किणी आणि त्यांचा भाऊ प्रकाश किणी असं शेतकऱ्याचे नाव आहे. 

Continues below advertisement

अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

जुना सर्वे नंबर 196 आणि नवीन सर्वे नंबर 87 प्रमाणे 50.2 गुंठे ही जागा मूळ मालक सुभाष किणी आणि त्यांचा भाऊ प्रकाश किणी यांची वडिलोपरजी मालकीची जमीन आहे. वर्षानुवर्ष किणी कुटुंब हे शेतीच्या उत्पनातून आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करत आहे. मात्रं त्यांच्या शेतातील केळीच्या झाडांची ज्ञात व्यक्तीने मोडतोड केल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. याबाबत अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे. महसूल आणि पोलिस प्रशासनाकडून याची गांभीर्याने दखल घ्यावी व नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तत्काळ मदत मिळावी अशी मागणी करण्यात येत आहे.

आमच्या बागेतील 100 ते 125 झाडे रात्रीत कापून टाकली, यावरच आमची उपजीविका होती

आमच्या बागेतील 100 ते 125 झाडे रात्रीत कापून टाकली आहेत. केळीचे घड देखील तोडून टाकले आहेत. आमची उपजीवीका याच केळीच्या बागेवर होती. मात्र, एका रात्रीत कोणीतरी आमची केळीची झाडे कापली असल्याची माहिती शेतकऱ्याने दिली आहे. या प्रकरणी पोलीस स्टेशनला आम्ही तक्रार दिली आहे. मात्र, अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. आताआम्ही काय करावं? असा सवाल शेतकऱ्याने केला आहे. पोलिसांनी आम्हाला सहकार्य करावं अशी मागणी शेतकऱ्याने केली आहे. आमची जमीन आहे ती व्यवस्थित राहावी, आम्हाला त्रास होऊ नये अशी मागणी देखील शेतकऱ्याने केली आहे. 

Continues below advertisement

गेल्या काही दिवसापूर्वीच सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातही द्राक्ष बागेवर किटकनाशाची फवारणी करण्यात आली होती

 
गेल्या काही दिवसापूर्वीच सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात देखील अशीच धक्कादायक घटना घडली होती. बार्शी तालुक्यातील कोरफळे येथील शेतकरी किरण बरडे यांच्या एक एकर द्राक्ष बागेवर अज्ञात माथेफिरुने तणनाशकाची फवारणी केली होती. यामुळं द्राक्ष उत्पादक शेतकऱ्याचे बारा लाख रुपयाचे नुकसान झाले होते. कृषी विभाग,तालुका पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन द्राक्ष कांड्यांचे नमुने घेतले असून ते प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले आहेत.
कोरफळे शिवारात किरण लिंबा बरडे यांची गट नंबर 183 मध्ये 1 एकर द्राक्ष बाग केली आहे. अज्ञात इसमाने तणनाशक औषध फवारले होते. त्याचा प्रभाव हळूहळू दिसू लागताच हा प्रकार शेतकऱ्याचे लक्षात आला. आजपर्यंत सलग चार वर्षापासून आज्ञात ईसम अशा पद्धतीने द्राक्ष बाग फवारणी करून बरडे या शेतकऱ्यास त्रास देत आहे.

महत्वाच्या बातम्या:

Nashik News: पावसाने टोमॅटो पिक वाया गेलं, द्राक्षानेही पदरी निराशाच; विषारी औषध पिऊन शेतकऱ्याने संपवला जीव, 'द्राक्ष पंढरी' हादरली!