दुचाकी अपघातात पोलीस कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू
एबीपी माझा वेब टीम | 23 Aug 2016 04:49 AM (IST)
पालघर: पालघर- मनोर रोडवर झालेल्या अपघातात एका पोलीस कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला आहे. वृषभ माळी असं या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव असून ते गोरेगाव पोलीस ठाण्यात कार्यरत होते. काल संध्याकाळी आपली ड्यूटी संपवून मोटारसायकलने घरी येत होते. यावेळी अज्ञात वाहनाने माळी यांच्या बाईकला धडक दिली. यात माळी यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर अज्ञात वाहनचालक घटनास्थळावरुन फरार झाला आहे.