आठ महिन्यांच्या मुलासह एनआरआय महिलेची नागपुरात आत्महत्या
एबीपी माझा वेब टीम | 23 Aug 2016 02:29 AM (IST)
नागपूर: नागपूरमधील घोगली परिसरात एका एनआरआय महिलेनं आपल्या आठ महिन्यांच्या चिमुकल्यासह आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. महिलेचं नाव प्राजक्ता देशमुख असून मुलाचं नाव सर्वेश असल्याचं समजतं आहे. गेल्याच महिन्यात अमेरिकेहून हे कुटुंब काही दिवसांसाठी भारतात आलं आहे. नागपूरला एका नातेवाईकाच्या घरी राहणारे प्राजक्ता आण सर्वेश शनिवारी संध्याकाळपासून बेपत्ता होते. रविवारी दुपारी त्यांचा मृतदेह विहिरीत आढळून आला. परवा रात्री सातच्या सुमारास प्राजक्ता सर्वेशसोबत बाहेर जाऊन येते असल्याचे सांगून निघाली. मात्र, रात्री उशिरापर्यंत दोघंही घरी परतलेच नाही. मात्र, रविवारी दुपारी स्वामीधाम नगरीतील क्रीडांगण परिसरात असलेल्या विहिरीत दोघांचा मृतदेह तरंगताना आढळून आला. या दोघांच्या मृत्यूनं परिसरात खळबळ उडाली असून पोलीस पुढील तपास करत आहेत