पालघर : पालघर लोकसभा पोटनिवडणुकीबाबत शिवसेना अद्यापही 'वेट अँड वॉच'च्या भूमिकेत दिसत आहे. कारण 'मातोश्री'वर झालेल्या बैठकीनंतरही श्रीनिवास वनगा यांना उमेदवारी द्यायची की नाही यावर अद्याप शिक्कामोर्तब झालेलं नाही.
याआधी सकाळीच शिवसेनेकडून भाजपचे दिवंगत खासदार चिंतामण वनगा यांचे पुत्र श्रीनिवास वनगा यांना उमेदवारी दिल्याचं वृत्त होतं. तसंच ते उद्या सकाळी 11 वाजता उमेदवारी अर्ज दाखल करतील, असंही म्हटलं जात होतं. मात्र यासंदर्भात बैठकांवर बैठक सुरु असून शिवसेनेने अजूनही ठोस भूमिका जाहीर केलेली नाही.
पालघर पोटनिवडणुकीसंदर्भात सकाळपासून 'मातोश्री'वर खलबतं सुरु आहे. प्रत्येक पदाधिकारी, आमदार आणि खासदाराला पोटनिवडणुकीची विभागवार जबाबदारी देण्यात आली होती. परंतु या बैठकीनंतरही शिवसेनेने उमेदवारीबाबत अधिकृत घोषणा केली नाही.
वनगा कुटुंबीयांचा भाजपला रामराम
चिंतामण वनगांच्या निधनानंतर भाजपने आपल्या कुटुंबाला वाऱ्यावर सोडल्याचा आरोप वनगा कुटुंबियांनी केला होता. आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याकडे वेळ मागितली. मात्र ती देण्यात न आल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली होती.
त्यानंतर चिंतामण वनगांच्या पत्नी आणि मुलाने 3 मे रोजी 'मातोश्री'वर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेट घेतली आणि शिवसेनेत प्रवेशही केला.
भाजपकडून मन वळवण्याचा प्रयत्न
वनगा कुटुंबियांनी केलेल्या आरोपांशी सहमत नसल्याचं पालघरचे पालकमंत्री विष्णू सावरा यांनी सांगितलं. वनगांसोबत अनेक वर्षं काम केलं, आम्ही एकाच गुरुचे शिष्य आहोत. अनेकवेळा पराभवानंतरही आम्ही पक्षाचं काम सोडलं नाही, असंही सावरा म्हणाले होती.
वनगांच्या मुलाला निवडणूक लढवण्याची इच्छा होती, मात्र अद्याप त्या ठिकाणी पोटनिवडणुकीसाठी त्याला उमेदवारी द्यायची नाही असा निर्णयच झाला नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं होतं.
वनगा कुटुंबाला उमेदवारी देण्यासाठी शिवसेनेचे प्रयत्न
पालघर पोटनिवडणुकीसाठी चिंतामण वनगांचे पुत्र श्रीनिवास यांना उमेदवारी द्या, अशी मागणी पालघरमधील शिवसैनिकांनी केली होती. शिवसेनेकडून श्रीनिवास यांना उमेदवारी दिल्यास, आम्ही सर्वतोपरी मेहनत करुन, त्यांना निवडून आणू, असा विश्वास शिवसैनिकांनी वरिष्ठांना दिला होता. त्यानंतर चिंतामण वनगांच्या कुटुंबीयांनी शिवसेनेशी हातमिळवणी केली.
28 मे रोजी पोटनिवडणूक
पालघर लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आतापर्यंत 18 उमेदवारांनी अर्ज घेतला आहे. पालघर आणि गोंदिया लोकसभा मतदारसंघासाठी 28 मे रोजी पोटनिवडणूक होत असून 31 मे रोजी मतमोजणी होणार आहे.
संबंधित बातम्या
श्रीनिवास वनगांच्या उमेदवारीवर शिवसेनेचं शिक्कामोर्तब
वनगांच्या मुलाच्या मेसेजला पाचव्या मिनिटाला मी रिप्लाय केला : मुख्यमंत्री
श्रीनिवास वनगांना वळवण्यासाठी सेना-भाजपच्या चाली
पक्षाने वाऱ्यावर सोडलं, दिवंगत खासदार वनगांच्या कुटुंबियांचा शिवसेनेत प्रवेश
पालघरचे भाजप खासदार चिंतामण वनगा यांचं निधन
पालघर आणि भंडारा गोंदिया लोकसभेसाठी पोटनिवडणूक जाहीर
श्रीनिवास वनगांच्या उमेदवारीबाबत शिवसेनेचं अजूनही वेट अँड वॉच!
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
07 May 2018 05:11 PM (IST)
याआधी सकाळीच शिवसेनेकडून भाजपचे दिवंगत खासदार चिंतामण वनगा यांचे पुत्र श्रीनिवास वनगा यांना उमेदवारी दिल्याचं वृत्त होतं.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -