पालघर: पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेना आणि भाजपामध्ये रस्सीखेच सुरु आहे. भाजपचे दिवंगत खासदार चिंतामण वनगा यांच्या कुटुंबीयांनी शिवसेनेशी हातमिळवणी केल्यानंतर, आता वनगा कुटुंबाला आपल्याकडे खेचण्यासाठी दोन्ही पक्ष चाली रचत आहेत.
भाजपाच्या दहिसरच्या आमदार मनीषा चौधरी आणि पदाधिकारी यांनी रात्री वनगांच्या घरी हजेरी लावली. तर शिवसेनेकडून श्रीनिवास वनगा यांना काल दुपारपासूनच अज्ञात स्थळी हलवलं आहे.
पक्षाने वाऱ्यावर सोडलं, दिवंगत खासदार वनगांच्या कुटुंबियांचा शिवसेनेत प्रवेश
आज शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे दुपारी 3 वाजता मनोर येथील सायलेंट रिसॉर्ट मध्ये बैठक घेणार आहेत.
पालघर लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आतापर्यंत 18 उमेदवारांनी अर्ज घेतला आहे.
पालघर आणि गोंदिया लोकसभा मतदारसंघासाठी 28 मे रोजी पोटनिवडणूक होत आहे. 31 मे रोजी मतमोजणी होणार आहे.
वनगा कुटुंबीयांचा भाजपला रामराम
भाजपचे पालगरचे दिवंगत खासदार चिंतामण वनगांच्या नाराज कुटुंबियांनी भाजपविरोधात दंड थोपटले. वनगांच्या निधनानंतर भाजपने आपल्या कुटुंबाला वाऱ्यावर सोडल्याचा आरोप वनगा कुटुंबियांनी केला. त्यामुळेच चिंतामण वनगांच्या पत्नी आणि मुलगा 3 मे रोजी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी मातोश्रीवर पोहोचले आणि त्यांनी शिवसेनेत प्रवेशही केला.
आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याकडे वेळ मागितली. मात्र ती देण्यात न आल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.
भाजपकडून मन वळवण्याचा प्रयत्न
वनगा कुटुंबियांनी केलेल्या आरोपांशी आपण सहमत नाही असं पालघरचे पालकमंत्री विष्णू सावरा यांनी म्हटलं आहे. वनगांसोबत अनेक वर्षं काम केलं, आम्ही एकाच गुरुचे शिष्य आहोत. अनेकवेळा पराभवानंतरही आम्ही पक्षाचं काम सोडलं नाही, असंही सावरा म्हणाले.
वनगांच्या मुलाला निवडणूक लढवण्याची इच्छा होती, मात्र अद्याप त्या ठिकाणी पोटनिवडणुकीसाठी त्याला उमेदवारी द्यायची नाही असा निर्णयच झाला नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं.
वनगा कुटुंबाला उमेदवारी देण्यासाठी शिवसेनेचे प्रयत्न
दरम्यान, पालघर पोटनिवडणुकीसाठी चिंतामण वनगांचे सुपुत्र श्रीनिवास यांना उमेदवारी द्या, अशी मागणी पालघरमधील शिवसैनिकांनी केली आहे. शिवसेनेकडून श्रीनिवास यांना उमेदवारी दिल्यास, आम्ही सर्वतोपरी मेहनत करुन, त्यांना निवडून आणू, असा विश्वास शिवसैनिकांनी वरिष्ठांना दिला.
संबंधित बातम्या
पक्षाने वाऱ्यावर सोडलं, दिवंगत खासदार वनगांच्या कुटुंबियांचा शिवसेनेत प्रवेश
पालघरचे भाजप खासदार चिंतामण वनगा यांचं निधन
पालघर आणि भंडारा गोंदिया लोकसभेसाठी पोटनिवडणूक जाहीर
श्रीनिवास वनगांना वळवण्यासाठी सेना-भाजपच्या चाली
संतोष पाटील, एबीपी माझा, पालघर
Updated at:
05 May 2018 10:12 AM (IST)
भाजपाच्या दहिसरच्या आमदार मनीषा चौधरी आणि पदाधिकारी यांनी रात्री वनगांच्या घरी हजेरी लावली. तर शिवसेनेकडून श्रीनिवास वनगा यांना काल दुपारपासूनच अज्ञात स्थळी हलवलं आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -