पालघर लोकसभा पोटनिवडणूक निकाल लाईव्ह- पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार राजेंद्र गावित यांनी बाजी मारल्याचं चित्र आहे. त्यांनी 25 हजार पेक्षा जास्त मतांनी आघाडी घेतली आहे. त्यांच्या विजयाची औपचारिक घोषणा बाकी आहे.
पालघर : आगामी लोकसभा निवडणुकीचा ट्रेलर म्हणून ज्या पोटनिवडणुकांकडे पाहिलं जात होतं, त्या पालघर आणि भंडारा-गोंदिया पोटनिवडणुकीचा निकाल आज लागला. मुख्यमंत्री आणि भाजपसाठी प्रतिष्ठेची बनलेल्या पालघर लोकसभा पोटनिवडणुकीमध्ये भाजपनं यश खेचून आणलं. काँग्रेसमधून भाजपमध्ये उमेदवारी मिळवलेल्या राजेंद्र गावित यांनी भाजपमधून शिवसेनेत गेलेल्या श्रीनिवास वनगा यांचा जवळपास 30 हजार मतांनी पराभव केला. बहुजन विकास आघाडीचे बळीराम जाधव हे तिसऱ्या स्थानावर राहिले. तर माकपचे उमेदवार चौथ्या, आणि काँग्रेसच्या दामोदर शिंगडा यांना पाचव्या स्थानावर समाधान मानावं लागलं. या मतमोजणीत सुरुवातीपासून भाजपच्या राजेंद्र गावित यांनी आघाडी घेतली होती. दुपारी एक पर्यंत राजेंद्र गावित यांना 2 लाख 37 हजारांपेक्षा जास्त मिळाली. तर शिवसेनेचे श्रीनिवास वनगा हे 2 लाख 9 हजार मतांसह दुसऱ्या क्रमाकांवर आहेत. मतमोजणीच्या अजून काही फेऱ्या शिल्लक आहेत. मात्र गावित हे जवळपास 28 हजार मतांनी आघाडीवर असल्याने, त्यांचा विजय जवळपास निश्चित मानला जात आहे. दुपारी 12 पर्यंत झालेल्या 14 फेऱ्य़ांमध्ये भाजपचे राजेंद्र गावित यांनी जवळपास 20 हजारांची आघाडी मिळवली होती. तर शिवसेनेचे श्रीनिवास वनगा ही सुरुवातीला तिसऱ्या स्थानावर होते, नंतर ते दुसऱ्या क्रमांकावर आले. पालघरमध्ये 28 मे रोजी लोकसभेसाठी पोटनिवडणूक झाली होती. शिवसेना-भाजपने पालघर पोटनिवडणूक प्रतिष्ठेची केल्यामुळे सगळ्यांचं लक्ष या निकालाकडे लागलं आहे. पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपाकडून काँग्रेसमधून आलेले राजेंद्र गावित, शिवसेनेकडून श्रीनिवास वनगा, काँग्रेसकडून दामोदर शिंगडा, माकपाकडून किरण गहला, बहुजन विकास आघाडीकडून बळीराम जाधव आणि इतर चार अपक्ष उमेदवार आहेत. भाजपचे खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनामुळे पालघरमध्ये पोटनिवडणूक झाली. पालघर पोटनिवडणूक निकालामध्ये अत्यंत चुरस पाहायला मिळत आहे. पहिल्या फेरीपासून भाजपने आघाडी घेतली आहे.
पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपाकडून काँग्रेसमधून आलेले राजेंद्र गावित, शिवसेनेकडून श्रीनिवास वनगा, काँग्रेसकडून दामोदर शिंगडा, माकपाकडून किरण गहला, बहुजन विकास आघाडीकडून बळीराम जाधव आणि इतर चार अपक्ष उमेदवार आहेत. मुख्यमंत्र्यांची वादग्रस्त ऑडिओ क्लिप, भाजपकडून पालघरमध्ये झालेलं कथित पैसे वाटप, चिंतामण वनगांच्या कुटुंबियांचा शिवसेनाप्रवेश, भाजपने काँग्रेसमधून आयात केलेले राजेंद्र गावित यामुळे पालघरची निवडणूक रंजक झाली आहे. या मतदारसंघात 17 लाख 31 हजार 77 मतदार आहेत. यापैकी 9 लाख 7 हजार 400 पुरुष तर 8 लाख 23 हजार 592 स्त्री, इतर 85 मतदार आहेत. दरम्यान, आज सकाळी 8 वाजल्यापासून सूर्या कॉलनी येथे मतमोजणी होणार आहे. आज पालघरमध्ये अग्निपरीक्षा आज 31 मे रोजी पालघरमध्ये होणाऱ्या मतमोजणीला सहा विधानसभा क्षेत्रांसाठी प्रत्येकी 14 असे एकूण 84 मोजणी टेबल मांडण्यात येणार आहेत. या प्रत्येक टेबलवर सुपरवायझर, सहाय्यक व मायक्रो ऑब्झरवर तसेच त्यांच्या जोडीला समन्वय साधणारे, डेटा एन्ट्री कर्मचारी असे सुमारे 600 अधिकारी - कर्मचारी कार्यरत राहतील अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी डॉ नारनवरे यांनी दिली. संबंधित बातम्या :