Palghar Accident: पालघर जिल्ह्यातील सफाळे येथील भादवे रस्त्यावर भीषण अपघात (Road Accident) घडलाय. या अपघात दोन जणांचा जागीच मृत्यू झालाय. ही घटना शुक्रवारी (21 जानेवारी) सकाळी 8.30 वाजताच्या सुमारास घडलीय. सफाळे येथून एडवण येथील आपल्या घरी परत जात असताना भादवे रस्त्यात उभ्या असलेल्या ट्रकला पाठीमागून धडक दिल्यामुळं हा अपघात घडल्याची माहिती समोर येत आहे. या अपघातानंतर परिसरात एकच खळबळ माजली आहे. याप्रकरणी स्थानिक पोलीस अधिक तपास करीत आहेत. 


मिळालेल्या माहितीनुसार, गणेश वैती (वय, 45) आणि दिपेश तरे (वय, 35) अशी मृतांची नावे आहेत. गणेश आणि दिपेश हे दोघेही सफाळे येथील एमएटी या चप्पल कंपनीत कामाला होते. दरम्यान, शुक्रवारी हे दोघेही सफाळे येथून दुचाकीवरून आपल्या घराकडं निघाले होते. त्यानंतर ते पंढपूरला जाणार होते. परंतु, भादवे रस्त्यात त्यांनी उभ्या असलेल्या ट्रकला पाठीमागून धडक दिली. या धडकेत दोघांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातानंतर संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे. 


लातूर-अंबाजोगाई रस्त्यावर भीषण अपघात; चार जणांचा मृत्यू, 15 जखमी
लातूर- अबाजोगाई रस्त्यावर काही दिवसांपूर्वी बस आणि ट्रकचा भीषण अपघात घडला होता. या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला होता. तर, 15 जण जखमी झाले होते. मिळालेल्या माहितीनुसार, लातूर औरंगाबाद ही बस लातूरमधून निघाली होती तर प्लास्टिक पाईप घेऊन जाणारा ट्रक हा आंबेजोगाईहून लातूरकडे जात होता. बर्दापूर फाट्याच्या नजीक एका वळणावर हा भीषण अपघात झाला होता. 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha