Pahalgam Terror Attack:पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील एकूण 6 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे . या सहा पर्यटकांचे पार्थिव एअर इंडियाच्या तीन विमानांमधून महाराष्ट्रात आणले जाणार आहेत .यातील चार पार्थिव दोन वेगवेगळ्या विमानांनी मुंबईत येणार आहेत . दोन पार्थिव व पुण्यात आणले जाणार आहेत . मुंबईमध्ये मंत्री आशिष शेलार आणि मंत्री मंगल प्रभात लोढा समन्वयासाठी मुंबई विमानतळावर असतील .तर पुणे विमानतळावर मंत्री माधुरी मिसाळ या उपस्थित असतील .पुण्यामध्ये केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ व्यवस्थितकडे लक्ष देतायत अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी माध्यमांना दिली .

विमानतळावर मंत्री उपस्थित

महाराष्ट्राचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन हे स्वतः श्रीनगरला जाऊन तिथे असलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांशी समन्वय साधत असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले .ज्या ज्या लोकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून तसेच एसएमएस करून प्रशासनाशी संपर्क साधला आहे त्या सर्व पर्यटकांची व्यवस्था करण्यात आली आहे . त्यातील काही लोक इंडिगोच्या विशेष विमानातून परत येणार आहेत .आज दिवसभरात कोणाकोणाला परत येण्यासाठी व्यवस्थेची गरज आहे याचा आढावा घेण्यात येणार आहे .

विमानतळावर कडेकोड बंदोबस्त

हेमंत जोशी आणि अतुल मोने यांचं पार्थिव घेऊन जाणारे विमान श्रीनगर होऊन दुपारी 1.15 वाजता निघाले ते आता मुंबईला पोहोचेल .पुण्याहून कौस्तुभ गणवते आणि संतोष जगदाळे यांचे पार्थिव संध्याकाळी पुण्यात आणले जाणार आहे .पुण्याहून हे विमान सायंकाळी सहा वाजता निघेल .या पार्श्वभूमीवर मुंबई विमानतळावर पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला आहे .

मृत्यूमुखी पडलेल्या पर्यटकांच्या परिवाराला 5 लाखांची मदत

मंत्रालयातील आपत्ती व्यवस्थापनाच्या वॉर रूममध्ये  सगळ्या व्यवस्था उभ्या करण्यात आले आहेत .यावरून मध्ये कोणालाही माहिती द्यायची असेल किंवा घ्यायची असेल ती देता येणार आहे .पहलगामचा हल्ल्यात जखमी झालेल्या पर्यटकांवर सध्या उपचार सुरू आहेत .जखमींना डॉक्टरांनी जाण्याचे परवानगी दिल्यानंतर त्यांना महाराष्ट्रात आणलं जाणार आहे .

पहलगाम येथील भ्याड दहशतवादी हल्ल्यात प्राण गमवावे लागलेल्या महाराष्ट्रातील एकूण 6 जणांच्या कुटुंबीयांना 5 लाख रुपयांची आर्थिक मदत राज्य सरकारने जाहीर केली असून जखमींना 50,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे. महाराष्ट्रातील अडकलेल्या पर्यटकांना परत आणण्यासाठी एक विशेष विमान वापरण्यात येणार आहे आणि त्याचा खर्च राज्य सरकारतर्फे करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.

महाराष्ट्रातील एकूण 6 पर्यटकांचा मृत्यू झालाय. यात  डोंबिवलीच्या तिघांचा समावेश आहे. तर पुण्यातील दोन आणि पनवेलच्या एका पर्यटकाचा मृत्यू झालाय. डोंबिवलीचे अतुल मोने, संजय लेले आणि हेमंत जोशी यांचा या दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालाय. पुण्यातील संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय. तर पनवेलमधील दिलीप देसले यांचाही हल्ल्यात मृत्यू झालाय.  तर महाराष्ट्रातले एस बालचंद्रू, सुबोध पाटील, शोबीत पटेल हल्ल्यात जखमी झाले आहेत.

हेही वाचा: