नवी दिल्ली : केंद्र सरकारने देशातील 119 कर्तृत्ववान व्यक्तींना पद्म पुरस्कार जाहीर केला आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील 6 जणांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. पण राज्यातील ठाकरे सरकारने पद्म पुरस्कारांसाठी केंद्राकडे 98 मान्यवरांच्या नावांची शिफारस केली होती. त्यात उद्योगपती मुकेश अंबानीसह शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचेही नाव होते. ठाकरे सरकारने शिफारस केलेल्या 98 नावांपैकी केवळ ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांना पद्मश्रीचा बहुमान मिळाला.
एक नाही दोन नाही ठाकरे सरकारने राज्यातून 98 जणांची नावे मोदी सरकारकडे पद्म पुरस्कारासाठी पाठवली होती. मोदी सरकारने 98 पैकी सिंधुताई सपकाळ यांचे एक नाव स्वीकारले. सिंधुताईंनाही पद्मभूषण द्यावे अशी शिफारस राज्याची होती. मात्र केंद्र सरकारने सिंधुताईंना पद्मश्रीने गौरविले आहे.
राज्य सरकारने शिफारस केलेल्या नावांच्या यादीत शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांचंही नाव होतं. रोज त्यांच्या नावांनी राहुल गांधी मोदी सरकारवर निशाणा साधतात ते प्रख्यात उद्योगपती मुकेश अंबानी यांचीही सरकारने शिफारस केली होती. लिटिल मास्टर सुनील गावसकर , एचडीएफसी बँकेचे अध्यक्ष दीपक पारेख यांचे नाव पद्मविभूषणसाठी पाठविले होते. राजकीय क्षेत्रातील 3 जणांची नावे सरकारने सूचवली होती. त्यातसंजय राऊत आहेत. त्यांसोबतच कै. राजारामबापू पाटील आणि यशवंतराव गडाख यांच्याही नावाचा समावेश होता. मात्र, केंद्राने राजकीय नेत्यांपैकी एकाही व्यक्तीची शिफारस मान्य केली नाही.
पद्म पुरस्कारासाठी राज्य सरकार नावांची शिफारस करते. त्यावर केंद्राचा निर्णय अंतिम असतो. यावर्षी पद्मश्रीसाठी मारुती चितमपल्ली, अनिरुद्ध जाधव, प्रकाश खांडगे, विजया वाड, सदानंद मोरे, शिवराम रेगे (मरणोत्तर), शं.ना. नवरे (मरणोत्तर), दीपक मोडक, विठ्ठल पाटील, शंकरराव काळे (मरणोत्तर), लक्ष्मीकांत दांडेकर, यशवंतराव गडाख, राधेश्याम चांडक, निरजा बिर्ला, राजश्री पाटील, धनंजय दातार, प्रभाकर साळुंखे, उदय कोटक, विलास शिंदे, शशिशंकर (रवी) पंडित, उदय देशपांडे, प्रभात कोळी, खाशाबा जाधव (मरणोत्तर), अंजली भागवत, अजिंक्य राहाणे, युवराज वाल्मीकी, शंकर नारायण, स्मृती मानधना, वीरधवल खाडे, अशोक हांडे, आरती अंकलीकर टिकेकर, अश्विनी भिडे देशपांडे, विठाबाई नारायणगावकर (मरणोत्तर), सत्यपाल महाराज, ऋातक राशन, रघुवीर खेडकर, सुबोध भावे, प्रेमानंद गजवी, अशोक पत्की, अनिल मोहिले (मरणोत्तर), दिलीप प्रभावळकर, सुधीर गाडगीळ, राणी मुखर्जी, उद्धवबापू आपेगावकर, नागराज मंजुळे, गौतम राजाध्यक्ष (मरणोत्तर), रणवीरसिंग, मोहन जोशी, अशोक सराफ, राजदत्त, ऋषी कपूर (मरणोत्तर), अजय-अतुल, मुक्ता बर्वे, विक्रम गोखले, डॉ. अमोल कोल्हे, मिलिंद गुणाजी, पंडित अजय पोहनकर, जॉनी लिवर, डॉ. दुरू शहा, डॉ. ऋतुजा दिवेकर, मीनल भोसले, डॉ. शैलेश श्रीखंडे, डॉ. चित्तरंजन पुरंदरे, डॉ. कृष्णा कांबळे, डॉ. राहुल पंडित, डॉ. सुरेश भोसले, डॉ. मुफझल लकडावाला, डॉ. जगन्नाथ दीक्षित, डॉ. प्रतीत समदानी, डॉ. हिंमतराव बावसकर, डॉ. सुलतान प्रधान, अफरोज शहा, दिनू रणदिवे (मरणोत्तर), मधुकर भावे, एकनाथ ठाकूर या नावांची शिफारस केलेली होती.
राज्य सरकारने शिफारस केल्यांपैकी बरीचशी नावे सिनेमा, क्रिडा आणि कला क्षेत्रातली होती. केंद्र सरकारने देशातील 119 कर्तृत्ववान व्यक्तींना पद्म पुरस्कार जाहीर केला आहे. त्यामध्ये, महाराष्ट्रातील 6 जणांना पुरस्कार जाहीर करण्यात आलाय. राज्य शासनाच्या शिफारशी सरकारने स्वीकारल्या नसल्या तरी केंद्राने जाहीर केलेल्या नावे पण कतृत्ववान आहेत.
संबंधित बातम्या :