छेडछाडीचा विरोध करणाऱ्या आई-वडिलांना सळई, हंटरने मारहाण!
एबीपी माझा वेब टीम | 02 Apr 2018 10:47 AM (IST)
एक महिन्यापासून मुलीची छेडछाड सुरु होती. याबाबत मुलीने गावकऱ्यांना सांगितलं होतं. पण हितसंबंध जपण्यासाठी त्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही.
उस्मानाबाद : अल्पवयीन मुलीची छेडछाड का केली? अशी विचारणा करणाऱ्या आई-वडिलांना आठ जणांनी सळई आणि हंटरने जबर मारहाण केली आहे. उस्मानाबाद जिल्ह्याच्या उमरगा तालुक्यातील मळगी गावात रविवारी रात्री ही घटना घडली आहे. या घटनेत मुलीचे आई-वडील गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. एक महिन्यापासून मुलीची छेडछाड सुरु होती. याबाबत मुलीने गावकऱ्यांना सांगितलं होतं. पण हितसंबंध जपण्यासाठी त्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही. अखेर तिच्या आई-वडिलांनी याबाबत विचारणा केली असता आरोपींना त्यांना बेदम मारहाण केली. आठ आरोपींविरुद्ध विनयभंग आणि पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला असून ते सर्व पसार झाले आहेत. दरम्यान, या प्रकारानंतर मुलीच्या कुटुंबीयांनी गाव सोडण्याचा विचार करत आहेत. तसंच कुंटुंबीय मुलीचं शिक्षण बंद करण्याच्या तयारीत आहेत.