उस्मानाबाद: राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. राज्याचा एकूण निकाल 88.74 टक्के लागला आहे. आजच्या निकालात अनेक विद्यार्थ्यांनी तब्बल 100 टक्के गुण मिळवल्याचं समोर आलं आहे. पण उस्मानाबाद जिल्ह्यातील परांडा येथील नाहीद कुरेशी यांने चक्क 35 टक्के गुण मिळवले आहेत.


2015 साली कोल्हापूरच्या इंद्रजीत मोरेनं देखील अशाच पद्धतीनं 35 टक्के गुण मिळवले होते. त्यांचीच पुनरावृत्ती परांडाच्या नाहीद कुरेशीनं केली आहे. नाहीदला सर्वच विषयात 35 गुण मिळवले आहेत.

नाहीद कुरेशी हा परांड्यातील जिल्हा परिषद शाळेचा विद्यार्थी होता. एकीकडे अनेक विद्यार्थ्यांना चांगले गुण मिळून देखील नैराश्य येतं. पण नाहीदनं प्रतिकूल परिस्थितीत देखील 35 गुणांची कमाई करुन हे यश सपांदन केलं आहे.



दरम्यान, यंदाच्या निकालात 0.82 टक्क्यांनी घट झाली आहे. तसंच 48 हजार 470 विद्यार्थ्यांना 90 टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळाले आहे. तर अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा 18 जुलैपासून होणार असल्याची माहिती बोर्डाच्या अध्यक्षांनी दिली.

संबंधित बातम्या:

एक दिवसही शाळेत न गेलेल्या आर्चीला दहावीत 66.40 टक्के

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना अनावृत्त पत्र

उस्मानाबादच्या कोमल पवारची कौतुकास्पद कामगिरी, 100% गुण!

महाराष्ट्रातले दहावीचे गुणवंत!