मुंबई : राज्यातील स्मार्ट सिटी अभियानाला चालना देण्यासाठी राज्याचा 'ओरॅकल कंपनी'शी करार होणार आहे. हा करार करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रात्री अमेरिकेला रवाना झाले आहेत. ओरॅकल कंपनीचा पहिल्यांदाच एखाद्या राज्याशी सामंजस्य करार होणार आहे.
ओरॅकल कंपनीने राज्याला निमंत्रण दिलं आहे. ओरॅकलकडून राज्यातील स्मार्ट सिटी अभियानासाठी सेंटर ऑफ एक्सलन्स उभारण्यात येणार आहे. करारानंतर ओरॅकल कंपनी कल्याण-डोंबिवली, मीरा-भाईंदर आणि पिंपरी-चिंचवड या तीन महापालिकांना स्मार्ट सिटी अभियानासाठी मदत होणार आहे.
https://twitter.com/CMOMaharashtra/status/777465892770689024
https://twitter.com/CMOMaharashtra/status/777561240310644736
ओरॅकलतर्फे ओपन वर्ल्ड या आंतरराष्ट्रीय परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. यामध्ये मुख्यमंत्र्यांचं प्रमुख भाषण होणार असून एखाद्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना प्रथमच असा सन्मान मिळत आहे.
https://twitter.com/CMOMaharashtra/status/777560842506166272