Maharashtra Assembly Election 2024 वर्धा :

  लोकसभा निवडणुकीत (Loksabha Election 2024) वर्धा लोकसभा मतदारसंघ चर्चेत राहिला तो काँग्रेसच्या अमर काळे (Amar Kale) यांनी शरद पवारांच्या (Sharad Pawar NCP) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तुतारी चिन्हावर निवडणूक लढल्यामुळे. पण आता पुन्हा एकदा वर्ध्यात काँग्रेसच्या (Congress) हक्काच्या असलेल्या आर्वी विधानसभा क्षेत्रात खासदार अमर काळे यांनी त्यांच्या पत्नी मयुरा काळे यांना विधानसभेच्या रिंगणात उतरविण्याचा डाव आखला आहे. त्यासाठीची मोर्चेबांधणीही मतदारसंघात सुरू असल्याची चर्चा आहे.


असे असले तरी एकाच घरात दोन्ही उमेदवारी देण्याला आता काँग्रेसकडून विरोध व्हायला लागला आहे. पती खासदार तर पत्नी आमदार अशा घराणेशाहीच्या राजकारणाला काँग्रेस नेते शैलेश अग्रवाल यांनी विरोध केला आहे. आर्वी विधानसभा क्षेत्रात सामान्य माणसाशी नाळ जुडवून असलेले अनेक नेते असताना येथील जागा ही काँग्रेसला सुटावी, अशी मागणी त्यांच्याकडून करण्यात आली आहे.


आर्वी विधानसभेत खासदाराच्या पत्नी तुतारी चिन्हावर निवडणुकीच्या रिंगणात? 


महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीची (Loksabha Election) रणधुमाळी संपली असून आता विधानसभा निवडणुकांचे  (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) वारे वाहू लागले आहेत. अशातच आगामी विधानसभेची (Vidhan Sabha Election 2024) अद्याप घोषणा झालेली नसली तरी, आगामी विधानसभेसाठी सर्व पक्षांनी आपली कंबर कसली असून राजकीयदृष्ट्या सर्वांगाने जुळवाजुळव सुरू केली आहे. अशातच यंदाची राज्यातील विधानसभेची निवडणूक चुरशीची होणार आहे. कारण गेल्या दोन वर्षांत महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात (Maharashtra Politicle Updates) अनेक राजकीय भूकंप झाल्याचं पाहायला मिळालं आहे.


त्यामुळे या सर्व घडामोडी राज्याच्या राजकारणाला हादरे देणाऱ्या ठरल्या असून, ज्या मतदार राजानं हे राजकीय हादरे झेलले, तो मतदार राजा यंदा राज्याचं सिंहासन कुणाच्या हवाली करणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. अशातच आता पुन्हा एकदा वर्ध्यात काँग्रेसच्या (Congress) हक्काच्या असलेल्या आर्वी विधानसभा क्षेत्रात खासदार अमर काळे यांनी त्यांच्या पत्नी मयुरा काळे यांना विधानसभेच्या रिंगणात उतरविण्याचा डाव आखला आहे. 


इंदिरा गांधीच्या काळापासून विदर्भ काँग्रेसचा गड


महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपासंदर्भात तीन दिवसांचा चर्चा सुरू आहे. येणाऱ्या काही दिवसात सगळे पार्टीचे लोक ते ठरवतील. विदर्भ काँग्रेसचा गड आहे. इंदिरा गांधीच्या काळापासून विदर्भ काँग्रेसच्या सोबत राहिलेला आहे. किंबहुना यावेळी सुद्धा मतदार मविआ सोबत राहतील. लोकसभेतही विदर्भाने सपोर्ट केला आहे. जागावाटपाच्या वेळेस या सगळ्या गोष्टी लक्षात ठेऊ आणि जागावाटापासंदर्भात निर्णय घेऊ, अशी माहितीही ही रमेश चेन्नीथला यांनी बोलताना दिली.


हे ही वाचा