Opposition Party Meeting : सत्ताधारी भाजपच्या विरोधात तयार झालेल्या इंडिया (INDIA) आघाडीची उद्या (31 ऑगस्ट) मुंबईत बैठक होणार आहे. या बैठकीसाठी विरोधी पक्षातील सर्वच व्हीव्हीआयपी नेते मुंबईत (Mumbai) दाखल होत आहेत. या पार्श्वभूमीवर नेत्यांच्या सुरक्षेला मोठं प्राधान्य देण्यात आलं आहे. सांताक्रुजमधल्या ग्रॅंट हयात हॉटेलच्या (Grand Hyatt Hotel Santacruz) जवळपास त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था पाहायला मिळत आहे. नेत्यांच्या व्यवस्थेसाठी हॉटेलमधील 280 खोल्या आरक्षित करण्यात आल्या आहेत.


नेत्यांच्या स्वागतासाठी रस्त्यावर फ्लेक्सची गर्दी


दरम्यान, इंडिया आघाडीच्या नेत्यांच्या स्वागतासाठी ग्रॅंट ह्यातकडे जाणाऱ्या रस्त्यावर फ्लेक्सची गर्दी बघायला मिळत आहे. काँग्रेस, आम आदमी पार्टी, जेडीयू, समाजवादी पार्टी, डीएमके सोबतच सर्वच विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून आपल्या प्रमुख नेत्यांचे फोटो बॅनर्सवर लावण्यात आल्याचं दिसतंय. या बॅनर्सवर राहुल गांधी, मल्लिकार्जुन खर्गे, अरविंद केजरीवाल, एम.के. स्टॅलिन, अखिलेश यादव, नितीशकुमार, भगवंत सिंह मान, आदित्य ठाकरेसारख्या नेत्यांचे स्वागत करतानाचे बॅनर्स बघायला मिळणार आहे. एकीकडे इंडिया आघाडीच्या नेत्यांसोबतच मुंबईतील रस्त्यांवर फ्लेक्सची गर्दी देखील पाहायला मिळत आहे.


या राज्यांचे मुख्यमंत्री बैठकीसाठी उपस्थित राहणार


दरम्यान, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत सिंह मान हे विद्यामान मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. सोबतच, काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी, लालु प्रसाद यादव, तेजस्वी यादव, खासदार राहुल गांधी, मल्लिकार्जुन खर्गे, शरद पवार, उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहेत. तसेच स्टॅलिन, नितीश कुमार आणि ममता बॅनर्जी यांची सुरक्षा यंत्रणा मुंबईत दाखल झाली आहे. त्यांच्याकडून ग्रॅंट हयात हॉटेलची तपासणी करण्यात आली आहे. या बैठकीच्या तयारीसाठी तिन्ही पक्षाचे 300 सक्रिय कार्यकर्ते काम करत आहेत. त्यांच्यावर वेगवेगळ्या जबाबदाऱ्या देखील देण्यात आल्या आहेत. 


दरम्यान, उद्या होणाऱ्या बैठकीसाठी इंडिया आघाडीचे नेते मुंबईत दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. राजदचे नेते लालू प्रसाद यादव, बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव, जम्मू-कश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुक अब्दुल्ला मुंबईत दाखल झाले आहेत.


महत्त्वाच्या बातम्या:


Opposition Party Meet: भाजप विरोधातील इंडिया आघाडीला स्थानिक पक्षांचीही साथ; प्रागतिक विकास मंचानेही दर्शवला पाठिंबा