मुंबई : अवनी वाघिणीवरून आज शिवसेना मंत्रिमंडळात आक्रमक होण्याची नौटंकी करते आहे. मात्र महाराष्ट्रात गेल्या 4 वर्षांमध्ये 13 हजारांहून अधिक शेतकरी आत्महत्या झाल्या; तेव्हा मंत्रिमंडळाच्या एकाही बैठकीत शिवसेनेला कधी कंठ का फुटला नाही? असा सवाल करून विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी अवनी वाघिणीच्या मृत्यूची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली आहे.
ते म्हणाले की, अवनी वाघिणीमुळे प्रामुख्याने यवतमाळ जिल्ह्यातील हजारो नागरिक प्रचंड दहशतीखाली होते. त्यामुळे तिचा बंदोबस्त करणे अनिवार्यच होते. मात्र, तिला वेळीच आणि योग्य पद्धतीने जेरबंद करण्यात सरकार अपयशी ठरले. सरतेशेवटी तिला संशयास्पद पद्धतीने ठार मारण्यात आले. त्यामुळे या प्रकरणाच्या निष्पक्ष चौकशीची आवश्यकता त्यांनी विषद केली.
मागील ४ वर्षांपासून भारतीय जनता पक्षाने शिवसेनेच्या‘वाघा’चा गळा आवळून धरला आहे. मात्र अधूनमधून दिनवाणीपणे गुरगुरण्यापलिकडे शिवसेना काहीही करू शकलेली नाही. ‘वाघा’चा गळा आवळण्यामध्ये आता भाजप चांगलीच पटाईत झाली आहे. सत्ता जाण्याची भीती दाखवली की, शिवसेनेचा ‘वाघ’मूग गिळून बसतो. त्याचे नाटकी गुरगुरणे थांबते, हे महाराष्ट्राने अनेकदा अनुभवले आहे, अशी बोचरी टीकाही विखे पाटील यांनी यावेळी केली.
शेतकऱ्यांबाबत शिवसेनेला कंठ का फुटत नाही? : राधाकृष्ण विखे पाटील
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
13 Nov 2018 08:23 PM (IST)
अधूनमधून दिनवाणीपणे गुरगुरण्यापलिकडे शिवसेना काहीही करू शकलेली नाही. ‘वाघा’चा गळा आवळण्यामध्ये आता भाजप चांगलीच पटाईत झाली आहे. सत्ता जाण्याची भीती दाखवली की, शिवसेनेचा ‘वाघ’मूग गिळून बसतो. त्याचे नाटकी गुरगुरणे थांबते, हे महाराष्ट्राने अनेकदा अनुभवले आहे, अशी बोचरी टीकाही विखे पाटील यांनी यावेळी केली.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -