मुंबई : दहावीच्या विद्यार्थ्यांना बदललेल्या अभ्यासक्रमातील विषयांच्या प्रश्नपत्रिकांचा सराव व्हावा यासाठी 26 नोव्हेंबर पासून महाराष्ट्र पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ (बालभारती ) च्या वतीने उद्यापासून ऑनलाइन सराव प्रश्नसंच विद्यार्थ्यांसाठी दिले जाणार आहेत.


उद्यापासून रोज एक विषयाचा पेपर www.ebalbharati.in या संकेत स्थळावर अपलोड केला जाणार आहे. तर 6 डिसेंबर पासून याची उत्तरपत्रिका आणि तज्ज्ञ मंडळींचे याबाबतचे व्हिडीओ सुद्धा बालभारतीकडून अपलोड केले जाणार आहेत.

इयत्ता दहावीच्या परीक्षा मार्च 2019 मध्ये होणार आहेत. त्याआधी विद्यार्थ्यांना बदलत्या अभ्यासक्रमाच्या प्रश्नपत्रिकेचा सराव व्हावा आणि आत्मविश्वास वाढवा यासाठी हे सराव प्रश्नसंच बालभारतीकडून अपलोड केले जाणार आहेत.

या सराव प्रश्नपत्रिका विद्यार्थी स्वतः किंवा शिक्षकांच्या मार्गदर्शनाने सोडवू शकतो ज्याने त्याला प्रश्नपत्रिका सोडविण्याचे आकलन होईल. या प्रश्नपत्रिका सोडविल्यानंतर उत्तरपत्रिका आणि तज्ज्ञांचे व्हिडिओ पाहिल्यानंतर विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिकांचा सराव होईल आणि आपल्या चुका लक्षात येतील.

सराव प्रश्नपत्रिका / उत्तरपत्रिका अपलोड होण्याची तारीख
सर्व प्रथम भाषा-  26 नोव्हेंबर -  6 डिसेंबर
सर्व द्वितीय भाषा-  27 नोव्हेंबर  - 7 डिसेंबर
सर्व तृतीय भाषा - 28 नोव्हेंबर - 8 डिसेंबर
विद्यान 1 -  29 नोव्हेंबर - 9 डिसेंबर
विद्यान 2 - 30 नोव्हेंबर - 10 डिसेंबर
गणित भाग 1 - 1 डिसेंबर - 11 डिसेंबर
गणित भाग 2 - 2 डिसेंबर - 12 डिसेंबर
इतिहास व समाजशास्त्र- 3 डिसेंबर - 13 डिसेंबर
भूगोल- 3 डिसेंबर - 14 डिसेंबर