Omicron Variant In Maharashtra : महाराष्ट्रावरील कोरोना महामारीचे संकट दिवसागणिक अधिक गडद होत चालले आहे. दैनंदिन रुग्णसंख्येत सातत्याने वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्यातच कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरियंटनेही चिंता वाढवली आहे. देशात सर्वाधिक ओमायक्रॉनचे रुग्ण महाराष्ट्रात आहेत. राज्याच्या आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी राज्यात सहा नव्या ओमायक्रॉन रुग्णाची भर पडली आहे. तर आतापर्यंत 180 रुग्णांनी ओमायक्रॉनवर मात केली आहे.

राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी  राज्यात ६ ओमायक्रॉन संसर्ग असणारे रुग्णांची नोंद झाली आहे.  यामध्ये पुणे ग्रामीणमधील तीन रुग्णाचा, पिपरी चिचंवड मनपामधील दोन रुग्णाचा तर पुणे मनपामधील एका रुग्णाचा समावेश आहे. त्यामुळे राज्यातील ओमायक्रॉनबाधित रुग्णाची संख्या 460 इतकी झाली आहे. यातील २६ रुग्ण हे इतर राज्यातील तर प्रत्येकी १ रुग्ण पालघर, जळगाव, नवी मुंबई,‍नाशिक, रायगड आणि औरंगाबाद येथील आहे. सात रुग्ण ठाणे  आणि चार रुग्ण कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत. तर 9 रुग्ण विदेशी नागरिक आहेत. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सर्वेक्षणात हे रुग्ण आढळले आहेत.

राज्यात कुठे किती रुग्ण?

अ.क्र.

जिल्हा /मनपा

आढळलेले एकूण ओमायक्रॉन रुग्ण

मुंबई

३२७*

पिंपरी चिंचवड

२८

पुणे ग्रामीण

२१

पुणे मनपा  

१३

ठाणे मनपा

१२

नवी मुंबई, पनवेल

प्रत्येकी ८

कल्याण डोंबिवली 

नागपूर आणि सातारा

प्रत्येकी ६

उस्मानाबाद

१०

वसई विरार

११

नांदेड

१२

औरंगाबाद, बुलढाणा, भिवंडी निजामपूर मनपा, मीरा भाईंदर

प्रत्येकी २

१३

 लातूर, अहमदनगर, अकोला,  कोल्हापूर

प्रत्येकी १

 

एकूण

४६०

राज्यात आज 9 हजार कोरोना रुग्ण - 
राज्यात आज तब्बल 9,170 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 1,475  रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत असल्याचं दिसून येत आहे. राज्यात शनिवारी सात रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.  राज्याचा मृत्यूदर 2.11 टक्के झाला आहे. राज्यात सध्या 9 हजार 170 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. राज्यात आतापर्यंत 65 लाख 10 हजार 541 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे एकूण रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.35 टक्के इतकं आहे.  सध्या राज्यात 2 लाख 26 हजार 01 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 1064  व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. आजपर्यंत 6,91,36,643 लोकांच्या प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे. त्यापैकी 66,87,991 म्हणजे 9.67 टक्के लोक कोरोना बाधित सापडले आहेत.