मुंबई : राज्यात शनिवारी ओमायक्रॉनच्या आठ नव्या रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे राज्यातील एकूण ओमायक्रॉनच्या रुग्णांची संख्या ही 48 वर पोहोचली आहे. आज सापडलेल्या आठ रुग्णांपैकी साताऱ्यात तीन, मुंबई विमानतळावरील सर्वेक्षणात चार तर पुण्यात एक रुग्ण सापडले आहेत. देशातील सर्वाधिक ओमायक्रॉनचे रुग्ण हे महाराष्ट्रात आहेत. 


राज्यातील ओमायक्रॉनच्या एकूण 48 रुग्णांपैकी मुंबई येथे 18, पिंपरी चिंचवड येथे 10, पुणे ग्रामीण येथे 6, पुणे मनपा क्षेत्रात 3 कल्याण डोंबिवली येथे 2, उस्मानाबाद 2, बुलढाणा 1, नागपूर 1, लातूर 1 आणि वसई विरार येथे 1 अशा रुग्णांची नोंद झाली आहे. यापैकी 28 रुग्णाांना त्यांची आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.


राज्यातील स्थिती
राज्यात शनिवारी 854 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर 804 जणांनी कोरोनावर मात केली आहे. याच कालावधीत कोरोनामुळे 11 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. राज्यात आजपर्यंत एकूण 64 लाख 96 हजार 733 करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 97.71% इतके झाले आहे.


राज्याच्या आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, सध्या राज्यातील मृत्यूदर 2.12 टक्के एवढा झाला आहे. राज्यात आज ओमायक्रॉनच्या आठ रुग्णांचीही भर पडली आहे. त्यामुळे राज्यातील एकूण ओमायक्रॉनबाधित रुग्णांची संख्या 48 इतकी झाली आहे. 


संबंधित बातम्या :