पुणे : ओएलक्स या ऑनलाईन खरेदी-विक्री वेबसाईटद्वारे दिवसेंदिवस ग्राहकांच्या फसवणुकीचे प्रमाण वाढले आहे. राज्यस्थान, हरियाणा, उत्तर प्रदेश राज्याच्या सीमेवरील मेवाड भागात कार्यरत असलेले काही भुरटे देशभरातील लोकांची फसवणूक करत आहेत. ओएलक्स वेबसाईटवर दुचाकी वाहने, कार, फर्निचर, महागडे मोबाईल, घरगुती वापराच्या वस्तू विक्रीच्या नावाखाली लोकांची फसवणूक केली जात आहे.


संपर्कासाठी मोबाईल क्रमांक देतो. ही वाहने, या वस्तू भारतीय सैन्यातील जवानाच्या असल्याचे सांगत त्याचे बनावट ओळखपत्र दाखवले जाते. यामुळे सामान्य लोक यावर विश्वास ठेवतात. यावर पुणे सायबर पोलिसांनी कडक कारवाईला सुरवात केली आहे.

पुणे शहरात गेल्या वर्षी म्हणजेच 2018 ला 225 तक्रारींची नोंद करण्यात आली होती. तर हीच आकडेवारी यावर्षी पाचपटींनी वाढली आहे. 2019 या वर्षात आतापर्यंत 1 हजार 300 तक्रारींची नोंद करण्यात आली आहे. ओएलक्सद्वारे केले जाणारे फसवणुकीचे गुन्हे कमी करण्यासाठी स्वतंत्र पोलीस पथक तयार करण्यात आहे.

त्यांनी आतापर्यंत 1 हजार 961 ओएलएक्स आयडी तसेच 2 हजार 16 मोबाईल नंबर ब्लॉक केले आहेत. याद्वारे हे गुन्हे कमी होण्यास मदत होणार आहे. 1 हजार 308 मोबाईल हँडसेट आणि 2 हजार 245 आयएमइआय नंबर बंद केले आहेत. त्यामुळे गेल्या दोन महिन्यात ओएलएक्सवरील गुन्हे कमी होण्यास मदत झाली आहे. मात्र नागरिकांनी ओएलक्सवरील वस्तू खरेदी करताना सतर्कता बाळगावी असे आव्हानही पोलिसांनी केले आहे.