Old Pune-Mumbai highway Accident :जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर (Old Pune-Mumbai highway) खासगी बस (Private bus) दरीत कोसळून भीषण अपघात झाला. या खासगी बसमध्ये 40 ते 45 प्रवासी होते.  हे सगळे प्रवासी झांज वादक आणि कलाकार होते. या अपघातात मृत्यू झालेल्या प्रवाशांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रद्धांजली वाहिली आहे आणि अपघातातील प्रत्येक मृताच्या नातेवाईकांना PMNRF (Prime Minister's National Relief Fund) कडून 2 लाख रुपये आणि जखमींना 50 हजारांची मदत जाहीर केली आहे. 









पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करत शोक व्यक्त केला आहे. 'रायगडच्या बस अपघातात मृत्यू पावल्याची घटना दुर्दैवी आहे. ज्या लोकांनी आपले प्रियजन गमावले त्यांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत. जखमी झालेले प्रवासी लवकरात लवकर बरे होतील अशी मला आशा आहे. रायगडमधील बस दुर्घटनेतील प्रत्येक मृताच्या नातेवाईकांना PMNRF कडून 2 लाख रुपये तर जखमींना 50 हजारांची मदत जाहीर करत आहे', असं पंतप्रधान मोदींनी ट्वीट केलं आहे.


मुख्यमंत्र्यांकडूनही मदत जाहीर


खासगी बस अपघाताबद्दल राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी दुःख व्यक्त केलं आहे. या अपघातात मृत झालेल्यांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत जाहीर केली आहे. तर जखमींवर शासकीय खर्चाने उपचार करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.


तरुण प्रवाशांचा मृत्यू झाल्याने हळहळ


या बसमध्ये एकून 42 प्रवासी होते. पुण्याहून मुंबईला जात होते. त्या दरम्यान बस दरीत कोसळून अपघात झाला. या अपघातात आतापर्यंत 13 प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे तर 29 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. जखमी प्रवाशांवर वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरु आहे. यात तरुण वयातील प्रवाशांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. 


मृत व्यक्तींची नावं...


1) जुई दिपक सावंत, वय 18 वर्ष, गोरेगाव, मुबई
2) यश सुभाष यादव
3) कुमार. विर कमलेश मांडवकर, वय 6 वर्ष
4) कुमारी.वैभवी साबळे, वय 15 वर्ष
5) स्वप्नील श्रीधर धुमाळ वय 16वर्ष
6) सतिश श्रीधर धुमाळ, वय 25 वर्ष 
7) मनीष राठोड, वय 25 वर्ष,
8) कृतिक लोहित, वय 16 वर्ष, गोरेगाव, मुंबई 
9) राहुल गोठण, वय 17 वर्ष, गोरेगाव मुंबई.
10) हर्षदा परदेशी, वय १९ वर्ष, माहीम,मुंबई.
11) अभय विजय साबळे, वय 20 वर्ष,मालाड,मुंबई.
12) एक  मयत ओळख पटलेली नाही.