सिल्लोड शहरापासून अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर हा पूल आहे. सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांनी या पुलाच्या दुरुस्तीसाठी एक महिन्यापूर्वीच संबंधित विभागाला पत्र लिहिलं होतं, अशी माहिती त्यांनी दुर्घटनेनंतर दली. दरम्यान प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे पुन्हा एकदा महाड दुर्घटनेची पुनरावृत्ती झाली.
पाहा बातमीचे आणखी फोटो
सार्वजनिक बांधकाम विभागाने लवकरात लवकर दुरुस्ती करु, असं आश्वासनही दिलं होतं. सुट्ट्या असल्यामुळे रस्त्यावरुन वाहतूक कमी होती. त्यामुळे सुदैवाने यात मोठी जिवीतहानी टळली.