मुंबई: बांठिया आयोगाच्या अहवालानुसार राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यात याव्यात असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत. त्यामुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता ओबीसी आरक्षणासह होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. येत्या दोन आठवड्यात निवडणुका जाहीर कराव्यात असेही निर्देश न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदांच्या निवडणुकीमध्ये आता ओबीसींना 27 टक्क्यांपर्यंत आरक्षण मिळणार आहे. 


बांठिया आयोगाने ओबीसींना 27 टक्के आरक्षण देण्याची शिफारस केली आहे. हे आरक्षण देत असताना अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती तसेच ओबीसी यांची सदस्य संख्या 50 टक्क्यांहून अधिक होऊ नये अशी अट आहे. त्यानुसार राज्यातील 34 जिल्हा परिषदांमध्ये ओबीसींसाठी वेगवेगळ्या जागा आरक्षित करण्यात आल्या आहेत. बॅकवर्ड क्लास ऑफ सिटिझन या प्रवर्गामध्ये ओबीसींचा समावेश करुन त्यांच्यासाठी काही जागा आरक्षित करण्यात आल्या आहेत. 


बॅकवर्ड क्लास ऑफ सिटिझन (Backward Class Of Citizens- BCC) या घटकामध्ये इतर मागासवर्गीय प्रवर्ग म्हणजे ओबीसी तसेच विमुक्त जाती आणि जमातींचा समावेश केला जातो. बॅकवर्ड क्लास ऑफ सिटिझन हा प्रवर्ग ठरवण्याचा अधिकार राज्य सरकारकला आहे. 


बांठिया आयोगाने दिलेल्या अहवालानुसार राज्यातील काही जिल्ह्यात 0 टक्के आरक्षण आहे, तर काही जिल्ह्यात ओबीसींच्या जागा कमी झाल्या आहेत. या सर्वाचा विचार करता  पूर्वीपेक्षा साधारण 6 टक्के जागा कमी झाल्या आहेत.


राज्यातील 34 जिल्हा परिषदांमध्ये ओबीसींसाठी राखीव जागा



  •  

  • अहमदनगर (Ahmednagar)- 19

  • अकोला (Akola)- 9

  • अमरावती (Amravati)- 6

  • औरंगाबाद (Aurangabad)- 16

  • बीड (Beed)- 16

  • भंडारा (Bhandara) 13

  • बुलढाणा (Buldhana)- 15

  • चंद्रपूर (Chandrapur)- 8

  • धुळे (Dhulr)- 2

  • गडचिरोली (Gadchiroli)- 0

  • गोंदिया (Gondia)- 10

  • हिंगोली (Hingoli)- 12

  •  

  • जळगाव (Jalgaon)- 15

  • जालना (Jalna)- 15

  • कोल्हापूर (Kolhapur)- 18

  • लातूर (Latur)- 15

  • नागपूर (Nagpur)- 11

  • नांदेड (Nanded)- 13

  • नंदुरबार (Nandurbar)- 0

  • नाशिक (Nashik)- 2

  • उस्मानाबाद (Osmanabad)- 14

  • पालघर (Palghar)- 0

  • परभणी (Parbhani)- 14

  • पुणे (Pune)- 20

  • रायगड (Raigad0- 15

  • रत्नागिरी (Ratnagiri)- 14

  • सांगली (Sangli)- 16

  • सातारा (Satara)- 17

  • सिंधुदुर्ग (Sindhudurg)- 13

  • सोलापूर (Solapur)- 18

  • ठाणे (Thane)- 10

  • वर्धा (Wardha)- 11

  • वाशिम (Washim)- 11

  • यवतमाळ (Yavatmal)- 10