Laxman Hake on Manoj Jarange : विजयादशमी दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर आज बीडमध्ये दोन दसरा मेळावे पार पडले. भगवानगडावर आमदार पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा पार पडला. नारायणगडावर मनोज जरांगे पाटील यांचा मेळावा पार पडला. दोन्ही मेळाव्यातून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आले. भगवानगडावर झालेल्या मेळाव्यासाठी ओबीसी आंदोलनकर्ते लक्ष्मण हाके सुद्धा उपस्थित होते. यावेळी पंकजा मुंडे यांनी लक्ष्मण हाके यांना दसरा मेळाव्याला उपस्थित राहिल्याबद्दल त्यांचा गोंडस लेकरू असा उल्लेख केला. मी कोणालाही दसरा मेळावासाठी निमंत्रण देत नाही. मात्र, माझ्या सन्मानार्थ हाके आल्याने आनंद असल्याचे पंकजा मुंडे म्हणाल्या. दरम्यान लक्ष्मण हाके यांनी भगवान गडावरील मेळावा पार पडल्यानंतर पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीकास्त्र सोडले.


मेळावा घेऊन प्रश्न सुटणार नाही 


मनोज जरांगे पाटील म्हणाले की, एका व्यासपीठावर बसून आरक्षणावर चर्चा करू, मेळावा घेऊन हा प्रश्न सुटणार नाही. त्यांनी सांगितले की, जरांगे पाटील यांना आम्ही आवाहन करतो की आम्ही दोन पावले पुढे येण्यासाठी तयार आहोत. तुम्ही देखील दोन पावले पुढे यायला पाहावं. आरक्षणाची कोणाला गरज आहे याबाबतीत संवाद झाला पाहिजे. केवळ मेळावा घेऊन हा प्रश्न सुटणार नसल्याचे लक्ष्मण हाके म्हणाले. 


तर शिव्याने उत्तर मिळेल, तुम्ही नमस्कार केला तर नमस्कार करू


तुम्ही शिव्या दिल्या तर शिव्याने उत्तर मिळेल, तुम्ही नमस्कार केला तर नमस्कार करू असे हाके म्हणाले. दरम्यान, लक्ष्मण हाके यांनी ओबीसीमध्ये समावेश करण्यासाठी सरकारने अनुमती दिलेल्या 17 जाती ओबीसीमधील असल्याचा दावा लक्ष्मण हाके यांनी केला. त्यामुळे आम्ही त्यांचे स्वागत करत असल्याचे लक्ष्मण हाके म्हणाले. मराठा समाजाने सामाजिक मागासलेपण सिद्ध करावे आणि आरक्षण घ्यावं असेही लक्ष्मण हाके यांनी सांगितले. निवडणूक जिंकण्याची भाषा करणारे मागास कसे आहेत असा हा प्रश्न असल्याचे लक्ष्मण हाके म्हणाले. महाराष्ट्र शांत राहिला पाहिजे हे महत्त्वाचा असून महाराष्ट्र नेतृत्वाच्या शोधात आहे. मी पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांना महाराष्ट्र नेतृत्व करण्याची विनंती केली असल्याचे लक्ष्मण हाके म्हणाले. 


इतर महत्वाच्या बातम्या