आरोग्य विभागातील भरती प्रक्रियेसाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेत ढिसाळ नियोजन आणि चुकीच्या प्रश्नपत्रिका मिळाल्याच्या मुद्यावरून काही दिवसांपूर्वीच गदारोळ झाला होता. ही परीक्षा घेणाऱ्या 'न्यासा'  कंपनीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. आता, चुकीच्या प्रश्नपत्रिका मिळालेल्या आरोग्य विभागाच्या उमेदवारांच्या परीक्षा न्यासा कंपनीच घेणार आहे. 28 नोव्हेंबरला 589 विद्यार्थ्यांची 11 संवर्गाची परीक्षा नाशिक पुणे लातूर अकोला या जिल्ह्यांमध्ये घेतली जाणार आहे. 


मागील महिन्यात, 24 ऑक्टोबरला गट 'क' साठी घेण्यात आलेल्या आरोग्य विभागाच्या परीक्षेमध्ये काही विद्यार्थ्यांना दुसऱ्या पदाच्या (संवर्गाच्या) प्रश्नपत्रिका मिळाल्याने गोंधळ निर्माण झाला होता. तर या परिक्षेदरम्यान काही उमेदवारांना चुकीचे प्रश्‍नपत्रिका देण्यात आल्याचेही निर्दशनास आले होते. घडलेल्या या प्रकारानंतर 'न्यासा कम्युनिकेशन' यांनी उमेदवारांनी दिलेला परिक्षेचा संवर्ग आणि प्रश्‍नपत्रिका क्रमांकानुसार चुकीची प्रश्‍नपत्रिका प्राप्त झालेल्या उमेदवारांची यादी सादर करण्याचे  आवाहन केले होते. 


त्यानुसार आता हे यादी प्राप्त झाली असून अशा उमेदवारांची परीक्षा परत घेण्यात येणार आहे.  ज्या उमेदवारांना चुकीची प्रश्नपत्रिका देण्यात आली होती त्याच उमेदवारांची पुन्हा परीक्षा होणार आहे. एकूण 589 उमेदवारांची होणार गट 'क' ची परीक्षा पुन्हा होणार आहे.


अशी होणार परीक्षा 


त्यानुसार आता या विद्यार्थ्यांची शंभर गुणांची परीक्षा न घेता 40 गुणांची परीक्षा घेतली जाणार आहे. या परीक्षेसाठी 50 मिनिटांचा वेळ असणार आहे. इतर 60 प्रश्न हे सर्व संवर्गासाठी सारखे असल्याने फक्त 40 गुणांची परीक्षा होणार आहे. 


ज्या विद्यार्थ्यांना चुकीची प्रश्नपत्रिका मिळाली होती व ज्यांची परीक्षा पुन्हा एकदा घेतली जाणार अशा विद्यार्थ्यांना परीक्षेसाठीचे प्रवेशपत्र (हॉलतिकीट) सुद्धा नासा कंपनीने पाठवण्यास सुरुवात केली आहे. 


इतर महत्त्वाच्या बातम्या :


One Year of Farmers Protest : ऊन, वारा, पाऊस अन् लाठीचार्ज, तरीही निर्धार ठाम; बळीराजाच्या आंदोलनाचं एक वर्ष!


Devendra Fadnavis : चंद्रकांत पाटील यांच्यानंतर देवेंद्र फडणवीस यांची दिल्लीवारी, भाजपच्या गोटात नेमकं शिजतंय काय?