नागपूर : गेल्या 5 वर्षात राज्यातील वनांमध्ये वाघांची संख्या 204 वरून 250 पर्यंत वाढली आहे. तसेच देशाच्या लोकसभेतही वाघांची संख्या वाढली असून आगामी विधानसभेत ही वाघ वाढतील असे सुचक वक्तव्य वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे. गेल्या पाच वर्षात राज्याच्या वनक्षेत्रात किती वाघ वाढले, या प्रश्नावर उत्तर देताना मुनंगटीवार यांनी हे विधान केले.
मुनगंटीवार म्हणाले की, राज्याच्या वनक्षेत्रात 2014 मध्ये २०४ मोठे वाघ होते. आज त्यांची संख्या 250 पर्यंत वाढली आहे. केंद्र सरकारने अद्याप वाघांच्या वाढलेल्या संख्येबद्दल आकडे जाहीर केले नसले तरी महाराष्ट्रातील वनक्षेत्रात गेल्या 4 वर्षात सुमारे 25 टक्के वाघ वाढले आहेत.
वाघांच्या आकडेवारीबद्दल माहिती दिल्यानंतर उपस्थित पत्रकारांनी मुनगंटीवारांना महाराष्ट्रात नेमके कोणते वाघ वाढले? असा प्रश्न विचारला. यावर मुनगंटीवार म्हणाले की, 'त्या' वाघांची संख्याही वाढली आहे. गेली 5 वर्ष आपण त्या वाघाच्यांही संरक्षण आणि संवर्धनाची जबाबदारी हातात घेतलीच आहे. त्यामुळे येत्या विधानसभेतही त्या वाघांची संख्या वाढेल असा विश्वास मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.
वन विभागाच्या 33 कोटी वृक्ष लागवडीच्या मोहिमेसंदर्भात माहिती घेण्यासाठी मुनगंटीवार यांनी नागपुरात वन अधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीनंतर मुनगंटीवार माध्यमांशी बोलत होते.
Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
राज्यात वाघांची संख्या 204 वरुन 250 वर, देशाच्या लोकसभेतही वाघ वाढले : सुधीर मुनगंटीवर
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
29 May 2019 11:01 PM (IST)
गेल्या 5 वर्षात राज्यातील वनांमध्ये वाघांची संख्या 204 वरून 250 पर्यंत वाढली आहे. तसेच देशाच्या लोकसभेतही वाघांची संख्या वाढली असून आगामी विधानसभेत ही वाघ वाढतील असे सुचक वक्तव्य वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -