इंदापूर: महाराष्ट्राची लालपरी अशी ज्या एसटी बसची ओळख आहे. त्या बसमध्ये आता वायफाय सेवा सुरु झाली आहे. पुणे जिल्ह्यातील इंदापूरच्या एसटी आगारामध्ये ही सुविधा सुरु करण्यात आली आहे. राज्यभरातील जवळपास 18 हजार बसमध्ये टप्पा टप्प्यानं प्रवाशांना वायफाय सेवा मिळणार आहे.


पुणे जिल्ह्यातील बहुतांश आगारामध्ये ही सोय आहे. एसटीचा प्रवास सुखकर, आनंददायी आणि मनोरंजन करण्याबरोबरच प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं महामंडळाच्या वतीनं सांगण्यात आलं आहे.

या वायफायचा वापर कसा करायचा याबद्दलच्या सूचना एसटी बसच्या सीटच्या मागे देण्यात आल्या आहेत. इंदापूरमधील 55 बसमध्ये सध्या वायफायची सोय सुरु झाली आहे.