जळगाव : मुलाच्या शोधासाठी रात्री घराबाहेर पडलेल्या महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याचं वृत्त आहे. जळगाव शहरात ही धक्कादायक घटना घडल्याचं उघडकीस आलं आहे.
रविवारी मध्यरात्री उशिरापर्यंत घरी न आलेल्या मुलाच्या शोधासाठी संबंधित महिला घराबाहेर पडली. विवेकानंदन उद्यान परिसरात राहणाऱ्या महिलेने दोन अनोळखी इसमांकडे आपल्या मुलाची विचारणा केली. त्यावेळी ती एकटी असल्याचं हेरुन त्या दोघांनी महिलेच्या मुलाला पाहिल्याचं खोटं सांगितलं.
त्यानंतर बागेत नेऊन अंधाराचा फायदा घेत दोघांनी पीडितेवर आळीपाळीने बलात्कार केला. या संदर्भात पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर, पीडित महिलेने दिलेल्या वर्णनावरुन त्याच परिसरात राहणाऱ्या दोन तरुणांना अटक करण्यात आली आहे.
दोघांविरोधात सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात झालेल्या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे.