मुंबई : मुंबईसह महाराष्ट्रात येत्या 24 डिसेंबरला अवघी शिवसृष्टी अवतरणार आहे. मुंबईतल्या अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या शिवस्मारकाच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमासाठी राज्य सरकारनं मेगा प्लॅन तयार केलाय.


उद्घाटन 24 डिसेंबरला असलं तरी 23 तारखेपासूनच म्हणजेच उद्यापासून वेगवेगळ्या कार्यक्रमांना सुरुवात होत आहे.

शिवस्मारकाच्या भूमीपूजनासाठी भाजपचा गाजावाजा


राज्यभर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने शिवस्मारक समारंभाचे फ्लेक्स वाटप करण्यात आले आहेत. राज्य सरकारने शिवस्मारकाच्या उद्घाटनासाठी मेगा प्लॅन तयार केला आहे.

कसा आहे मेगा प्लॅन?

राज्यभरातून आणि राज्याच्या बाहेरुन विविध सोळा ठिकाणांहून माती आणि पाणी आणण्यात येणार आहे.

शिवरायांचा पुतळा बनवायला मिळणं भाग्य समजतो : राम सुतार


23 तारखेला राज्यातून आलेली माती आणि पाणी यांचा कलश फ्लोटवर ठेवण्यात येईल. या फ्लोटसोबत सकाळी चेंबुरमधील शिवाजी महाराजांच्या मूर्तीपासून शोभायात्रेची सुरुवात होणार आहे.

फ्लोट आणि शोभायात्रा सायन, लालबाग, गिरगाव चौपाटी असा प्रवास करत गेट वे ऑफ इंडियाला पोहोचणार. त्यानंतर गेट वे ऑफ इंडियावर उभारलेल्या भव्य स्टेजवर हा कलश, माती आणि पाणी सोपवलं जाईल. हेच पाणी आणि माती मुख्यमंत्री 24 डिसेंबरला पंतप्रधानांना देणार आहेत. त्यानंतर पंतप्रधानांच्या हस्ते शिवस्मारकाचं भूमीपूजन होणार आहे.

VIDEO : असं असेल अरबी समुद्रातील शिवस्मारक!


शिवस्मारकाच्या भूमीपूजनासाठी शिवकालीन वातावरण निर्मिती करण्यासाठी सरकारने नितीन देसाईंकडून मेघडंबरी किल्ल्याचा देखावा साकारला आहे.

दरम्यान भव्य रॅली आणि कार्यक्रम मुंबईत असले तरी संपूर्ण महाराष्ट्र यानिमित्ताने शिवमय होणार आहे. कारण प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने कार्यक्रमाचे फ्लेक्स वाटप चालू असून अनेक ठिकाणी हे फ्लेक्स झळकणार आहेत.

शिवस्मारकाच्या भूमीपूजनापूर्वी 23 डिसेंबरला भव्य शोभायात्रा


24 तारखेला पंतप्रधान मोदींच्या हस्ते या शिवस्मारकाचं भूमिपूजन होईल. यावेळी मुख्यमंत्र्यासह राजघराण्यातील मंडळी आणि इतर मान्यवरही उपस्थित राहणार आहेत.

अरबी समुद्रात भूमीपूजनासाठी फक्त हे सहा जण उतरणार!

अरबी समुद्रात शिवस्मारकाच्या भूमीपूजन सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह फक्त सहा जण जाणार आहेत. भूमीपूजन आणि जलपूजनाला समुद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यपाल सी विद्यासागर राव, उद्धव ठाकरे, उदयन राजे, संभाजी राजे जाणार आहेत.