मुंबई : महाराष्ट्रात कोरोनाने गंभीर रुप धारण केलं आहे. कोरोना साखळी तोडण्यासाठी राज्यात 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध लागू करण्यात आले आहे. कोरोनाला रोखण्यासाठी वेगाने लसीकरण होणे गरजेचं आहे. अशात आज राज्यात लसीचा तुटवडा असल्याचे समोर आले आहे. तर दुसरीकडे लसींच्या पुरवठ्या संदर्भात केंद्राकडून महाराष्ट्राला सापत्न वागणूक मिळत असल्याचे आकडेवारीवरुन समोर आले आहे. दरम्यान महाराष्ट्राला फक्त लसी देण्यातच नाही तर कोरोना काळात महत्वाची वैद्यकीय उपकरणे देण्यातसुद्धा केंद्र सरकारने दुजाभाव केल्याची माहिती माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली आहे.

लोकसभेत दिलेल्या आकडेवारीनुसार गुजरात आणि उत्तर प्रदेश राज्यांना रुग्ण संख्येच्या कितीतरी अधिक पटीने N 95 मास्क, पीपीई किट्स आणि व्हेंटिलेटर्स केंद्र सरकारने दिले आहेत.

महाराष्ट्रासारख्या ज्या राज्यांना कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलाय त्या राज्यांना वाटपात प्राधान्य असायला हवं. पण तसं ते आकड्यांवरुन तरी दिसत नाही. ज्या  राज्यांमध्ये सध्या कोरोना सर्वाधिक वाढतोय त्यात ना गुजरात आहे ना उत्तर प्रदेश पण तरीही  सर्वाधिक साहित्य  या राज्यांना आहेत. 

राज्य    N 95 Mask  PPE Kits Ventilators
गुजरात 9623 4951  12.9
उत्तरप्रदेश 3916 2446  6.7
पश्चिम बंगाल 3214 848 2
तामिळनाडू 2213 639 1.7
कर्नाटक 1940 693  2.1
महाराष्ट्र 1560  723  2.2
केरळ 814 192   0.5

महाराष्ट्रसह ज्या पाच राज्यांमध्ये कोरोनाचं हे थैमान सुरु आहे, त्याच राज्यांमध्ये कोरोना डोसेसची संख्या वाढवायला हवीय.पण सध्या तरी कोरोना लसीच्या वाटपात ही काहीशी असमानता दिसत आहे. ज्याचा फटका महाराष्ट्रासारख्या राज्यांना बसत आहे.